रितेश कुमार टीलावत तालुका प्रतिनिधी तेल्हारा अकोला : अकोला शहराजवळील म्हैसपुर ह्या गावी होत असलेल्या 150 एकर च्या मोकळ्या जागेत शिवपुराण कथा वक्ते पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांच्या शिवपुराण कथेच्या निमित्ताने विजय जगदीशप्रसाद दुबे व श्री रूपेश (बंटी) चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते भव्य दिव्य स्वरूपात परिपुर्णते बाबत युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी वेगवेगळ्या समितींच्या माध्यमातून चोख नियोजन करण्यात येत आहे.अकोला शहराजवळील म्हैसपुर ह्या विस्तीर्ण अशा 150 एकरच्या परिसरात 5 मे ते 11 मे या दरम्यान राष्ट्रीय पातळीवरील शिवपुराणकथेचे आपल्या ओजस्वी वाणीतुन निरूपण करणारे पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे या कथेसाठी पाच लाख ते सात लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे .कथेसाठी 35 एकरात स्क्वेअर फुटाचा मंडप उभारण्यात येत आहे. कथेच्या निमित्ताने संपूर्ण परिसर हा स्वच्छ करण्यात येईल . बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था यावरही विशेष भर देण्यात येत आहे. केवळ अकोला जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भ तसेच परराज्यातूनही भाविक शिवपुराण कथेचे श्रवण करण्यासाठी म्हैसपुर अकोला शहरात येणार आहेत. अकोला शहरातून कथेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी 50 एकराची पार्किंग वाशिम ,पातुर, बार्शिटाकळी ,मेहकर, वाडेगाव कडुन येना-यान साठी 50 एकराची पार्किंग व्यवस्था उभारण्यात येनार आहे त्याचबरोबर 150 C.C. कॅमेराच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची सुरक्षा यंत्रणा देखरेखी खाली राहणार आहे .24 एलईडी च्या माध्यमातून भाविकांना कथा पाहता / ऐकता येणारआहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र 1000 खुर्च्याची आसन व्यवस्था करण्यात आली असून आपत्कालीन स्थितीसाठी पाच रुग्णवाहिका डाक्टर सह मेडीकल औषधि सह तैनात करण्यात.येतील भाविकांसाठी मोफत 20 लाख लिटर पाणी ,300 कुलर मंडप थंड करण्यासाठी फोगर फवारे तसेच 5000 सेवेकरी सेवेत राहनार आहेत इतर साहित्यांची व्यवस्था करण्यात येत असून जवळपास 300 दुकाने थाटण्यात येणार आहेत यात धार्मिक साहित्य विक्री ,पूजा साहित्य आणि अयोध्या तसेच मथुरा येथील स्वादिष्ट अशा मिठाई आणि भोजन सामग्रीचे दुकाने थाटण्यात येणार आहेत.दररोज एक ते दीड लाख लोकांची सकाळी 10 ते रात्री 7 वाजे प्रयत्न भोजनाची सपूर्ण व्यवस्था अकोला शहरातील भाविकांसाठी बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन येथून कथा मंडपात पर्यंत येण्यासाठी ऑटो रिक्षा ची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे वैद्यकीय कक्षा सह तयार होत असून महीला करीता 300 स्वच्छतागृह पुरूषा करीता 150 स्वच्छतागृह आणि इतर यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात येनार आहेत येणाऱ्या महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी शंभर महिला बाऊन्सर मदतीला राहणार आहेत एकूणच या सर्व कार्यासंदर्भात दररोज विजय जगदीशप्रसाद दुबे व श्री रूपेश (बंटी) चौरसिया जातीने लक्ष देत असून कार्यकर्त्यांच्या मदतीने कार्य पूर्ण करून घेत आहेत
Users Today : 18