सुमित सोनोने मुर्तीजापुर :-शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसत आहेत. चोरीचे प्रमाण थांबता थांबेनासे झाल्याचे दिसून येत आहे.अश्यातच जुनी वस्ती परिसरातील स्मशानभूमीतून तिरडी (शिडी) चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.एखाद्या परिवारात मृत्यू झाल्यानंतर घरातील सदस्यांची तारांबळ उडणे स्वाभाविक आहे. ही गोष्ट लक्षात घेता मा.नगराध्यक्ष तथा मा.नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी मृतकाच्या अंत्यविधीसाठी लागणारी सामग्री ही स्मशानभूमीत उपलब्ध करून दिली.प्रेत घरापासून ते स्मशानभूमीत आणण्यासाठी लागणारी तिरडी (शिडी) हे सुद्धा चोरीला गेल्याची घटना घडली याबाबत दुबे यांनी सोशल मीडियावर विनंती पर मेसेज वायरल केला होता.की ज्यांनी कुणी शिडी नेली असेल त्यांनी कृपया आणून द्यावी. परंतु या गोष्टीला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शहर पोलीस स्टेशनला तिरडी चोरीची तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.चोरट्यांना तिरडी सुद्धा पुरली नाही का ?असे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Users Today : 18