प्रतिनिधी अशोक भाकरे अकोला : महाबँक व्यवस्थापनाने गेल्या पाच दशकांपासून संघटनेकडे बँकेच्या इमारतीत असलेल्या पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर येथील कार्यालयातून संघटनेला जबरदस्तीने बाहेर काढले आहे. एआयबीईए ही संघटना महा बँकेत मान्यता प्राप्त, बहुमतातील संघटना म्हणून गेल्या साठ वर्षांपासून काम करते व त्याचाच एक भाग म्हणून संघटनेला बँक व्यवस्थापनांनी इतर सर्व बँकांप्रमाणे ही कार्यालये दीली होती, पण संघटना रचनात्मक टीकेचा भाग म्हणून व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांवर टिका करते ती विद्यमान व्यवस्थापनाने वैयक्तिक घेउन हेतुतः हे पाऊल उचलले आहे. ज्याच्या निषेधात महा बँकेतील मराठवाडा, विदर्भ, पुणे, अहमदनगर, मुंबई, सोलापूर येथील शाखा कार्यालयातील एआयबीईएचे सभासद दिनांक १६ जानेवारी रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जात आहेत. संपाच्या दिवशी सर्व सभासद आपापल्या शाखा कार्यालयासमोर निदर्शने करतील. संघटना बँक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करते तसेच बँकेचे ठेवीदार, ग्राहक यांच्या रक्षणासाठी देखील सतत काम करत आली आहे. बँकेने जेव्हा चूकीची कर्ज मंजूर केली तेंव्हा संघटनेने whistle blower चे काम करुन त्याला अटकाव घालायचा प्रयत्न केला म्हणूनच कींग फीशरच्या डॉ. वीजय माल्या यांच्या तावडीतून हि बँक वाचू शकली. संघटनेचा एक प्रतिनिधी बँकेच्या संचालक मंडळावर नेमला जातो तो गेली सहा वर्षांपासून नेमला गेलेला नाही, ज्यामुळे बँक व्यवस्थापन आपल्या हातातील अनिर्बंध सत्तेचा वापर करत कर्मचारी आणि संघटना यांच्या बाबत मनमानी निर्णय घेत आहे ज्यामुळे वीसंवादाचा सूरच उमटू नयेत. बँक व्यवस्थापनाच्या या सुडबुद्धिच्या धोरणांच्या विरोधात दिनांक १६ जानेवारीचा हा संप आहे ज्यात महा बँकेतील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे एआयबीईए संघटनेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
Users Today : 18