धांदल राडा ..
वर्मी लागला दगड
काचेला गेला तडा
सगळीकडे गोंधळ
झाला धांदल राडा
कुणाचे आहेत पाय
कुणाचा बुवा जोडा
एका गुन्ह्या सोबत
दुसरे हजारों जोडा
वेडी वाकडी वळणे
वाहू लागला ओढा
दिसेल त्याला आता
रे प्रवासामध्ये ओढा
लावा हजारो कलमे
घातक कृत्ये ताडा
कबूली जबाब हवा
रे हड्डी पसली तोडा
अधिकारी निलंबित
आणानवीन मुखडा
विष वल्ली पसरली
मुळा पासून उखडा
बिघडे पचन संस्था
हवाय जालीम सोडा
जाणा खरी संस्कृती
जहरी विकृती सोडा
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com
Users Today : 0