उच्चनिवडणूक..

Khozmaster
1 Min Read

उच्चनिवडणूक..

 

शिक्षक न् पदवीधर

रे निवडणूक वेगळी

उच्च विद्याविभूषीत

मंडळी सर्व सगळी

 

शिक्षण बिरुदावली

मिरवती सारे भाळी

जाग्रत प्रतिनिधित्व 

उच्च भ्रु मांदियाळी 

 

जाणे कायदे नियम

संहिता समग्र पाळी

संयत हवे आचार

नको टिंगलटवाळी 

 

वाटे भाषणे ऐकावी

जिव्हा नाही काळी

अभद्र कृत्ये नसावी

भाषा ना शिवराळी

 

प्रलोभने ना लोभवी

अश्लाघ्यकृती टाळी

मतांची खरेदी विक्री

गैर व्यवहार विटाळी

 

निरामय मतदान हो

दिव्या नको काजळी

प्रथेचे पावित्र्य राखी

शुध्दतेची गंगा जळी 

 

अपेक्षाभंग न व्हावा

निवडणूक आगळी

उमेदवार न् मतदार

जिम्मेदारी ती पाळी

 

– हेमंत मुसरीफ पुणे 

  9730306996..

0 9 4 2 4 3
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *