उत्खननासंबंधी निकालाचा फेरविचार करण्याची रिपाई(ए)ची मागणी

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी मुर्तीजापुर – सत्याची पडताळणी न करता कंत्राटदाराच्या व इतर कुणाच्या तरी दबावाखाली येऊन आपल्या तक्रारीवर देण्यात आलेल्या निकालाचा फेरविचार करावा, अशी विनंती प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआय(ए)चे जिल्हा कार्याध्यक्ष अजय प्रभे यांनी तहसीलदारांना दिलेल्या तक्रारवजा निवेदनातून केली आहे. नाला खोलीकरण व रुंदीकरण, साठवण तलाव, डोह करणे इत्यादी मंजूर असल्याचे तहसीलदारांच्या या तक्रारीवरील आदेशात म्हटले आहे, परंतु प्रत्यक्षात ही कामे झाल्याचे दिसून येत नाही, असे नमुद करणाऱ्या या निवेदनातून अवैधरित्या उत्खनन झालेल्या खनिजाचे मूल्यांकन करून दंडासह रॉयल्टी वसूल करावी, ही तक्रारीतील मागणी आणि तक्रारीचा खरा उद्देश डावलल्या गेल्याचे म्हटले आहे. तहसीलदारांच्या आदेशात मात्र मुळ विषयाला बगल देऊन दीशाभूल करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप करणाऱ्या या निवेदनाद्वारे शासनाचा महसूल बुडविण्याच्या गंभीर प्रकाराकडे दूर्लक्ष करणारी ही बाब अक्षम्य असल्याचेही म्हटले आहे.या प्रकरणी वस्तुस्थिती विचारात घेऊन चौकशी करावी व शासनाचा महसूल बूडविणाऱ्या संबधितांवर कारवाई करावी, अन्यथा या प्रकरणी जनहीत याचिका दाखल करावी लागेल, असेही या निवेदनात नमुद आहे.

0 9 4 7 1 9
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *