सेवाभावी संस्थेच्या मदतीने पोलिसांनी दिला मानवता धर्माचा प्रत्यय

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी मूर्तिजापूर – येथील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर एका अनोळखी ३० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. सदर मृतदेह १३ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील हेंडज फाट्याजवळ आढळून आला होता. याबाबत ग्रामीण पाेलीस स्टेशनमध्ये नाेंद करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आला होता, पाेलिसांनी इसमाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अद्याप पर्यंत ओळख न पटल्याने मृतदेह श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात शितगृहात ठेवलेला असल्याने अखेर जय गजानन आपत्कालीन पथक व महाकाल सेना या सेवाभावी संस्थेच्या मदतीने ग्रामीण पाेलीस ठाण्याच्या पाेलिसांनी मृतदेहावर दिनांक १७ जानेवारी राेजी विधीवत अंत्यसंस्कार केले.यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सत्यजित मानकर , हेड कॉ. विजय मानकर व रितेश मद्दी सह आपत्कालीन पथक महाकाल सेना या सेवाभावी संस्थेचे सेनापती शेवतकर, लखन मिलांदे, बादशहा,शैलेंद्र श्रीवास आकाश व गौरव इंगोले उपस्थित होते.

0 9 4 7 1 9
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *