प्रतिनिधी मूर्तिजापूर – तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक १२ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी खोडद शेत शिवारातून दुचाकी लंपास केल्याची घटना घडली होती.याबाबत फिर्यादी रविंद्र खुशाल बगळे वय ३६ वर्ष रा. खोडद यांनी माना पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती की, फिर्यादी हे त्यांचे मालकीची हिरो आय स्मार्ट स्प्लेंडर क्रमांक एम एच ३० ए एस ९३८१ ही दुचाकी किंमत ३० हजार रुपये त्यांच्या शिवारातील शेताजवळील खोडद ते कुरूम रेल्वे स्टेशन जाणा-या रस्त्यावर उभी करून शेतात कामासाठी गेले. शेतातुन काम करून परत रस्त्यावर आले असता रस्त्यावर त्यांना दुचाकी दिसुन आली नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांची मोटार सायकल चोरून नेली असल्याने त्यांच्या फिर्यादीवरुन भादवी ३७९ कलमान्वये दाखल गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला.याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे ,अप्पर पोलीस अधिक्षक मोनिका राउत , उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत , तसेच ठाणेदार कैलास भगत यांचे मार्गदर्शनाखाली शिपाई राजेश डोंगरे यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला असता गुन्हयाची उकल करण्यासाठी हद्दीतील गोपनीय बातमीदारांना कार्यान्वीत करण्यात आले होते. दरम्यान गोपनीय बातमीदाराकडुन विश्वसनीय माहीती मिळाली की, सदर गुन्हा आरोपी गणेश शालीकराम चव्हाण वय २८ वर्ष रा. साई नगर, वसंत कॉलनी, दर्यापुर व प्रविण प्रल्हाद सोळंके वय २९ वर्ष रा.खरब नवले या दोघांनी केला आहे. आरोपीतांना चौकशीकामी ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हया संबंधाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याने, त्याना नमुद गुन्हयात अटक करण्यात आले आहे. आरोपीतांकडुन पोलीस कोठडी दरम्यान गुन्हयातील दुचाकी जप्त करून गुन्हयाची उकल करण्यात आली आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी हे न्यायालयाचे आदेशाने न्यायालयीन कोठडी रिमांडमध्ये आहेत. यापूर्वी देखील आरोपीतांवर विविध गुन्हे दाखल आहेत. गुन्हयात कुठलेही प्रत्यक्षदर्शी पुरावे तसेच तांत्रीक पुरावे नसताना केवळ मानवी गुप्तवार्तेच्या आधारे कुशलतेने व बारकाईने तपास कौशल्य वापरून वरीलप्रमाणे गुन्हयांची उकल करण्यात आली आहे. गुन्हयाचे तपास पथकात ठाणेदार कैलास भगत, पोउपनी घनश्याम पाटील, पोकॉ राजेश डोंगरे , जयकुमार मंडावरे , पंकज वाघमारे , आकाश काळे यांनी मोलाची कामगीरी बजावली आहे.
Users Today : 9