चिखली तालुक्यातील मटकाकिंग चे लागेबांधे जि.पो.विभागासोबत..? का.प्र. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वरली मटका तात्पुरता बंद झाला आहे. नवीन पदभार स्वीकारलेल्या जि.पो.अधिक्षक सारंग आवाड यांचे अवैधधंद्यांना अनुसरुन कार्यान्वीत धोरण चांगले चर्चेस आले.त्यातच आपल्या कार्याचा ठसा उमटवत जिल्ह्यातील क्राइम ब्रांच चे अशोक लांडे यांची पो.नि. म्हणून वर्णी लागली. त्यामुळे अवैध धंद्यांना आवर बसणार अशा प्रकारच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र चिखली तालुक्यामधील अवैध धंद्यांना उफाण आलेे. वरली माफिया “अजब “फंडा वापरून माफियाची मात्र चांदी आहे .त्यामुळे इतर तालुक्यात वरली बंद असताना चिखली तालुक्यात सरास सुरू असलेल्या वरलीला जिल्हा पोलीस विभागाकडून अभय दिले जात आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. चिखली तालुक्यातील मेरा, पेट, उंदरी ,अमडापूर रायपूर ,चिखली शहर या ठिकाणी एकाच माफियाचे “अजब “एजंट राजेरोस पणे अवैध वरली मटका व्यवसाय करीत आहे. तालुक्यातील अनेक सुशिक्षित युवक, अल्पवयीन मुल पैशाच्या मोहापोटी वरली मटका व्यवसायाकडे गिरट्या घालताना दिसतात. शेतकरी, शेतमजूर् यांचा खिशाला चाळण बसत आहे.रस्त्यावर वरली माफी यांनी आपले दुकान थाटल्यामुळे महिलांची कुचंबना होत आहे .सार्वजनिक ठिकाणी वरलीमटका व्यवसायिकाच्या असभ्यवर्तनकी मुळे चिखली शहरासह तालुक्यातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी लोकल क्राईम ब्रांच बुलढाणा पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी सदर अवैध वरली मटका बाजार कडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे. त्याचप्रमाणे नव्यानेच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड त्यांच्याकडून सुद्धा जनतेला अपेक्षा वाढल्या आहेत .वरली माफियाच्या “अजाब” सुरू असलेल्या धंद्यांना रावांचे पाठबळ आहे. परिसरात रावांचा चांगलाच बोलबाला असून पोलीस विभागाला हप्ते देत असतो अशा प्रकारची बतावणी मोठ्या तोऱ्यात रावांचे लोक करीत आहेत. त्यामुळे चिखली पोलिसांसह जिल्हा पोलीस विभागापुढे वरली माफिया चे आव्हान उभे ठाकले आहे तुर्तास एवढेच..
Users Today : 37