रामेश्वर वाढी अकोला :- शेळद ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावा अशी मागणी बहुजन एकता पॅनलचे अध्यक्ष तथा तसेच अशोका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांनी बाळापुर पंचायत समिती मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे अकोला नाका, बाळापूर येथील पिण्याच्या टाकीचे वॉल कंपाउंड करणे, विहिरीपासून ते पिण्याचे पाण्याच्या टाकीपर्यंत नवीन पाईपलाईन करणे व तसेच अकोला नाका येथे अंगणवाडी बांधकाम करणे व उमर कॉलनी, कासारखेड येथे नवीन अंगणवाडी बांधकाम करणे, संपुर्ण शेळद ग्रामपंचायतमध्ये कचराकुंडी उपलब्ध करुन देणे, ग्रामपंचायतमधील रहिवाशी भागातील साफसफाई करण्याकरिता कर्मचारी उपलब्ध करणे, ज्या ठिकाणी नाल्या व रस्ते नाहीत त्या संपुर्ण शेळद ग्रामपंचायतमध्ये सर्व्हे करुन नाल्या व रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणे, अकोला नाका आखरे गाडेकर यांच्या घरासमोरील रस्ता, शेरु ठेकेदार यांच्या घरासमोरील रस्ता, डॉ. जावेद ते इमरान सर याच्या घराजवळून मेन रस्त्यापर्यंत, उमर कॉलनी येथे जाबीर खान यांच्या घरापासून ते अंसार खॉ यांच्या घरापर्यंत रस्ता, उमर कॉलनी येथे शेख फकीर यांचे घराजवळून ते मजीद पासून ते शकील भाऊ यांचे घरापर्यंत रस्ता, फातेमा कॉलनी येथे खलील पंजाबी यांच्या घरापासून जवाद भाऊ यांच्या घरापर्यंत रस्ता, महेंद्रभाऊ धनोकार ते ओम घनमोळे यांचे घरासमोरील रस्ता, अकोला नाका कुलट सर ते वाडेकर सर यांच्या घरामागील अर्धवट बांधकाम झालेला रस्ता पुर्ण करणे, अकोला नाका येथे ओपन स्पेस ठिकाणी डॉ. सचिन शर्मा यांचे घरामागील ओपन फेस येथे व्यायाम शाळा बांधणे, उमर कॉलनी येथे नवीन पाण्याची टाकी सुध्दा उपलब्ध करणे, उमर कॉलनी येथे ज्या ठिकाणी विदयुत पोल नाहीत त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करणे ह्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी बाळापूर पंचायत समिती मुख्याधिकारी यांना अशोका फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच बहुजन एकता पॅनलचे अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांनी निवेदनाद्वारे केली आहे हे काम लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे नाही तर बहुजन एकता पॅनल व शेळद ग्रामपंचायत नागरिक तिव्र आंदोलन करतील
Users Today : 8