दि.19 जानेवारी रोजी हिंदूसूर्य,महापराक्रमी, वीर योद्धा, क्षत्रिय कुलभूषण महाराणा प्रतापसिंह यांच्या पुण्यतिथी निमित्त हिंदी मराठी पत्रकार संघ कार्यालय येथे अभिवादन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वप्रथम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस माल्याअर्पण करून पूजन करत अभिवादन करण्यात आले.
मातृभूमीच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला अशा अदम्य साहसी वीर बलिदानी धर्म रक्षक राष्ट्ररक्षक महाराणा प्रतापसिंह यांचा 9 मे 1540 रोजी राजे उदयसिंह सिसोदिया राणी जयवंताबाई यांच्या पोटी कुंभलगड येथे जन्म झाला. आपल्या 56 वर्षांच्या जीवन प्रवासात महाराणा प्रताप यांचा 28 फेब्रुवारी 1572 रोजी राज्याभिषेक झाला. महाराणा प्रताप सिंह सिसोदिया राजपूत राजवंशाचे राजे होते. त्यांचे नाव इतिहासामध्ये वीरता व दृढ निश्चयासाठी अमर आहे. त्यांनी कितीतरी वर्षे मुगल सम्राट अकबरासोबत संघर्ष केला.त्यांनी कितीतरी वेळा मुघलांना युद्धामध्ये हरवले.1576 च्या हलदीघाटी युद्धामध्ये 500 भिल्ल सैनिकांना सोबत घेत आमीर सरदार राजा मानसिंहाच्या 80 हजार सैनिकांचा सामना केला. महाराणा प्रताप यांचा मृत्यू दि. 19 जानेवारी 1597 रोजी चावंड येथे झाला.
कटेंगे पर झुकेंगे नहीं, हे ब्रीदवाक्य महाराणा प्रताप यांनी अंगीकृत केलेले होते. आपल्या मातृभूमीच्या स्वाधीनतेसाठी आपले पूर्ण जीवन बलिदान करणारी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आणि त्यांचा स्वामीभक्त अश्व चेतक याला शत-शत कोटी कोटी प्रणाम अशा या महान धर्म रक्षकाच्या राष्ट्ररक्षकाच्या पुण्यतिथी निमित्त हिंदी मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी धनश्रीताई काटीकर पाटील , श्री उल्हास भाई शेगोकार, सतीश दांडगे, गौरव खरे, करणसिंग सिरसवाल, धर्मेशसिंह राजपूत, जमील भाई, प्रदीप इंगळे, योगेश सोनवणे, प्रा. प्रकाश थाटे सह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.
Users Today : 8