पुरातन वास्तू .. काळ कराल जबडा करू पाहे गिळंकृत वारसा दिव्यपुरातन जतन करे सुसंस्कृत पर्यटणां जाई आम्ही मने झाकाळे विकृत करुन ठेवितो गंदगी सुंदर सुरेख वास्तुत विनाश करणारे का हो ठेकेदार अधिकृत ऐतिहासिक इमारती अस्मिता करे जागृत अस्तित्वाने आपल्या वारसा करे अलंकृत विध्वंस करी हट्टांनी निसर्ग निर्मित प्राकृत पुरातनवास्तु जपावी कर्तव्यअसे अंगीकृत सुपूर्द करता वारसा पुढील पिढी उपकृत विचार आणि आचार नसावे उलटे अप्रकृत निसर्ग आपला प्राण राहू नकात कृताकृत – हेमंत मुसरीफ पुणे 9730306996.. www.kavyakusum.com