- गजानन माळकर
- तालुका प्रतिनिधी ,
मंठा : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हात से हात जोडो विस्तारित अभियान राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेवरून काही जिल्ह्यांत नवीन नेमणुका केल्या आहेत. त्यापैकी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी विधान परिषद सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे प्रतोद आ. राजेश राठोड यांची जिल्हा निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याला आ. राठोड हे औरंगाबाद जिल्ह्याचे प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या अगोदर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात अखिल भारतिय काँग्रेस कमिटी दिल्ली, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, कर्नाटक या राज्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. या निवडी बदल आ. राजेश राठोड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आमदार राजेश राठोड यांच्याकडे काँग्रेस पक्षाची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तालुक्यात काँग्रेस पक्ष मजबूत होताना दिसून येत आहे.