सैयद इमरान
मालेगांव – विदर्भ अर्बन सहकारी पतसंस्था सहकार चळवळीतील दीपस्तंभ असल्याचे जेष्ठ मार्गदर्शक भैरुलालाजी शर्मा यांनी म्हटले आहे.
पतसंस्थेच्या ‘विदर्भ अर्बन दिनदर्शिका २०२३’ चे प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला यावेळी शर्मा बोलत होते. याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गजानन भेंडेकर, उपाध्यक्ष नामदेव सुरेकर, चंद्रकात घुगे, उल्हासराव घुगे, अमोल कल्याणकर, योगेश देव, दीपक केंद्रे, गणेशराव नागरे, विजयराव वाघ, बाळासाहेब सरनाईक, श्रीकांत शर्मा, दत्तराव देशमुख, नंदकिशोर भोयर, पंकज गिते, उदय करंगे, सौ.मनीषा सरनाईक, सौ. स्वाती भेंडेकर सरव्यवस्थापक वैभव गौरकर, सैय्यद इमरान उपस्थित होते.
वाशीम जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विदर्भ अर्बन पतसंस्था गेली 10 वर्ष दिनदर्शिका पतसंस्थेच्या खातेदार, ठेविदार, ग्राहक, व हितचिंतक यांनी दिलेल्या सहकार्यामुळे विदर्भ अर्बन पतसंस्थेच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पतसंस्थेचे अध्यक्ष गजानन भेंडेकर व व्यवस्थापक वैभव गौरकर यांच्या हस्ते पतसंस्थेत करण्यात आले, या दिनदर्शिकेत पतसंस्थेच्या शाखांचे वर्धापण दिन, राष्टपुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी, भारतीय सण, उत्सव, राष्ट्रीय सुट्ट्या, शाखेचे फोन नुंबर्स आदी उपयुक्त माहिती दिली आहे. दिनदर्शिका 12 पानांच्या माहितीपूर्ण लेखनाचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गजानन भेंडेकर यांनी दिली.
संस्था अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून सभासदांना सेवा सुविधा देत आहे. याशिवाय धार्मिक व सामाजिक काम, विद्यार्थी मदत सारख्या सामाजिक कामात अग्रेसर असल्याचे शरद केंद्रे यांनी म्हटले. संस्थेच्या कामकाजावर सभासदांचा विश्वास असल्याचे भैरूलालजी शर्मा यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैय्यद इमरान यांनी तर बालाजी सानप यांनी आभार मानले.
Users Today : 25