मुर्तिजापुर (भुषण महाजन) – संपूर्ण महाराष्ट्र राज्या मध्ये स्वच्छ अभियानाअंतर्गत शहरे हागणदारीमुक्त करणे व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करुन शहर स्वच्छ ठेवण्याच्या अनुषंगाने मुर्तिजापुर शहरा मध्ये कचरा गाडयांचे उदघाटन मोठया थाटा-माटा करण्यात आले. आता मुर्तिजापुर शहर स्वच्छ होईल. ही आशा दिर्घकाळ न टिकता पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे.
घरकुल कॉलनी मध्ये सुध्दा अशीच स्थितीत पहावायास मिळते. नविन घरकुल कॉलनी मधील समस्यांचे नांवापुरते प्रशासनाकडून नागरिकांचे समाधान करण्यात येते. त्या समस्या कायमच्या काही केल्या सुटेनात. ही गंभीर बाब घरकुल कॉलनी परिसरातील नागरिकांनी नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष व्दारकाप्रसाद दुबे हयांच्या निदर्शनास आणून दिली. या अगोदर सुध्दा घरकुल कॉलनी मधील बऱ्याच समस्यांचे निराकरण व्दारकाप्रसाद दुबे यांनी केले आहे. परिसरातील नागरिकांना या कचऱ्यामुळे आरोग्याचे प्रश्न उदभवत असून दुर्गंधी सुध्दा सुटली आहे. शहरातील मुख्य रस्त्याच्यां साफ-सफाई बरोबरच इतरही परिसरातील साफ सफाई कडे प्रशासनाने लक्ष देवून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्याची मागणी व्दारकाप्रसाद दुबे यांनी केली आहे.
Users Today : 18