विध्यार्थ्यांना नदी पार करण्यासाठी पालकांची जीवघेणी कसरत. पातोंडा येथील प्रकार, पुलाची उंची कमी

Khozmaster
2 Min Read

विनोद वसु अकोट तालुका प्रतिनिधी : अकोट तालुक्यातील ग्राम पातोंडा ते जवळखेड रस्त्यावरील नदीवर बांधलेल्या पुलाची उंची कमी असल्याने तसेच नवीन पुलाचे बांधकाम चुकीच्या ठिकाणी होत असल्याने नेहमीच पुलावरून पाणी वाहते त्यामुळे विद्यार्थ्यांना नदीपार करून देताना पालकांना जीवघेणी कसरत करावी लागते.अकोट तालुक्यातील बऱ्यापैकी वस्ती असलेले पातोंडा हे एक गाव असून विकासापासून मात्र कोसो दूर आहे अनेकदा मुख्य बाजारपेठेची गावचा संपर्क तुटतो, गावाला जोडणारे सर्वच रस्ते अतिशय खराब असून रेल-पातोंडा रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. त्याचप्रमाणे पातोंडा- जवळखेड हा रस्ता आहे अतिशय खराब आहे रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत आणि बांधकाम चालू असलेल्या पुलाची उंची कमी असून फुल हा भलत्याच ठिकाणी बांधल्या जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे याविषयी गावातील नागरिक अनेकदा अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी यांच्याकडे आपल्या गऱ्हाणे मांडतात परंतु या विषयी संबंधितांकडून योग्य उपायोजना केल्या जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे………….. चौकट……………..विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.पातोंडा येथील तालुका किंवा जिल्ह्याच्या तसेच बाहेरठिकाणी शिक्षणासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांचे गावचा संपर्क तुटला असता अनेकदा गावाबहेर जाता येत नाही त्यामुळे अनेकदा त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे…………. प्रतिक्रिया…………..ज्या ठिकाणी नदीचा प्रवाह जास्त आहे त्या ठिकाणी उंच पूल बांधावा आणी रस्त्याचीही दुरुस्ती करावी. पावसाळ्यात अनेकदा गावचा संपर्क तुटतो त्यामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे तरी संबंधितांनी लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी. ( दिलीप भोंडे ग्रामस्थ)…………….. प्रतिक्रिया ……..नदीला पूर येऊन पुलावरून पाणी चढले असता अनेकदा गावचा संपर्ग तुटतो त्यामूळे माझ्या पाल्यांची शाळा बुडत होती नाईलाजाणे मी त्यांना अकोला येथे आजी आजोबांकडे शिक्षणाकरिता ठेवले. ( प्रमोद टाकसाळे)नदीला पूर आल्याने अनेकदा गावचा संपर्क तुटतो त्यामुळे पातोंडा येथील विद्यार्थ्यांना चोहोट्टा येतील शाळा, विद्यालयामध्ये पोहोचवता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. (चंद्रशेखर नरोकार, ऑटो चालक पातोंडा)

 

0 9 4 5 8 1
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *