माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ”* कृषी विभागाच्या उपक्रमातून बनोटी येथे मार्गदर्शन

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव राज्यात दिनांक ०१ सप्टेंबेर २०२२ ते ३० नोव्हेंबेर २०२२ या कालावधीत मराठवाडा व विदर्भ विभागातील शेतकऱ्यांच्या नैराश्य व त्यातून उद्भवणाऱ्या आत्महत्या यावर प्रभावीपणे उपाययोजना करून शेतकरी आत्महत्या होणार नाहीत तसेच बळीराजाला सुखाचे दिवस यावेत याकरिता “ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ” या उपक्रमाची सुरुवात प्रत्येक तालुक्यात करण्यात आली आहे त्यानुसार सोयगांव तालुक्यात आज दि.17-09-2022 रोजी मौजे बनोटी येथे कृषि विभाग व आत्मा यंत्रणा यांचे मार्फत विविध घटकांचे आयोजन करण्यात आले होते.आजच्या कार्यक्रमात प्रामुख्याने महसूल, जलसंधारण, ग्रामविकास, वीज खात्याच्या संदर्भातील अडचणी याबाबत चर्चा, पतपुरवठा व सामाजिक सुरक्षा, तंत्रज्ञान प्रसार, पिक वैविधिकरण तसेच शेतकऱ्यांना मार्केटशी जोडणे या विषयी आवश्यक त्या उपाययोजना याविषयी सरपंच व गावातील प्रगतशील शेतकरी तसेच उपसरपंच यांचेशी चर्चा करून गावचा प्रगतीचा आलेख सुधारण्याविषयी नियोजन करण्यात आले.आजच्या कार्यक्रमात एस. जी. वाघ तालुका कृषि अधिकारी सोयगांव प्रत्यक्ष बांधावर जाऊन कापूस व मका पिकाविषयी माहिती देऊन कृषि विविध योजनांचा लाभ घेण्याविषयी मार्गदर्शन केले. एच. बी. देशमुख कृषि पर्यवेक्षक यांनी महाडीबीटी, पिकविमा, ई पिक पहाणी याविषयी मार्गदर्शन केले, एस.एस.पाटील कृषि सहाय्यक बनोटी यांनी कापूस व मका पिकावरील किड व रोग याविषयी करावयाच्या उपाययोजना याविषयी माहिती दिली तसेच ए. एस. महाजन बी. टी. एम. सोयगांव यांनी शेतकरी गट व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती दिली.

तसेच बनोटी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेस भेट देऊन शेतकरी हिताच्या बँकेच्या विविध योजनांची माहिती घेतली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *