सतीश मवाळ मेहकर :तालुक्यातील डोणगाव येथे सकाळी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी डोणगाव यांच्या वतीने मदन वामन पातुरकर विद्यालय डोणगाव येथे वृक्ष लागवड करण्यात आले तसेच शाळेतील शिक्षकांना सीताफळ पेरु जांभूळ वृक्ष देण्यात आले व भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ही वटवृक्ष देण्यात आले.
भाजपा शहराध्यक्ष विलास परमाळे यांच्या कडून हे वटवृक्ष देण्यात आले.व त्यांनी मनोगत व्यक्त करताना मोदीजी ना दिर्घ आयुष्य लाभो वटवृक्ष प्रमाणे तळागाळापर्यंत मोदीजी चे कार्य पोहचत असुन भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते वाढत आहे.मनोगत व्यक्त केले यावेळी
अर्जुन वानखेडे विलास परमाळे भाजपा शहर अध्यक्ष डोणगाव आमोल बेदकर भाजपा नेते सागर बाजड युवा की.ता उपाध्यक्ष, आकाश बाजड युवा मोर्चा शहर अध्यक्ष, गणेश जाधव, भुजबळ मामा, देवीदास चव्हाण, गणेश भांगे, मुगल सर, गवळी सर पीपंरकर सर असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 11