एसटी अपघातातील जखमींना शासनाकडून भरीव मदत उपलब्ध करून देऊ – धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड

Khozmaster
1 Min Read

मलकापूर एसटी डेपो चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोन दिवसांपूर्वी मलकापूर ते पिंपळगाव देवी दरम्यान झालेल्या अपघातात दोन जणांचे हात तुटून त्यांना कायमचे अपंगत्व आले, त्या अपघातातील विकास गजानन पांडे वय- २२ रा.उऱ्हा.तालुका- मोताळा.या जखमीची आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांनी मलकापूर येथे येऊन रुग्णालयात भेट घेतली, यावेळी विकास पांडे यांच्या आईने आपल्या कुटुंबावर आलेल्या या संकटाची आपबीती कथन केली व माझ्या मुलाला कायमस्वरूपी एसटी महामंडळात नोकरी देण्याची मागणी केली, यानंतर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी एस.टी महामंडळाचे संबंधित अधिकारी व मलकापूर एसटी डेपो आगाराची व्यवस्थापक यांच्याशी भ्रमणध्वनीवरील संपर्क साधून चर्चा केली यावेळी अधिकाऱ्यांनी जखमींना पूर्ण वैद्यकीय खर्च देण्याची सांगितले तसेच राज्य शासनाकडून जखमींना पाच ते दहा लाख रुपयांची मदतही राज्य परिवहन महामंडळाकडून मिळून देऊ असे यावेळी आमदार धर्मवीर श्री. संजूभाऊ गायकवाड यांनी सांगितले

 

0 9 4 5 8 5
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *