हिरकणीने आत्मनिर्भर करून महिलांचे जिवनस्तर उंचावले – अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे

Khozmaster
5 Min Read

हिकरणी महिला अर्बन 10 व्या आमसभेत आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त शाळा षिक्षकांचा गौरव चिखली: 19 सप्टेंबर 2022 तब्बल दहा वर्षापूर्वी हिरकणी महिला अर्बन बॅंकेच्या लावलेल्या रोपटयाचे आज महावृक्षात रूपांतर झाले असुन सहकाराच्या माध्यमातुन ग्राहक सेवेचे वैषिष्टयपुर्ण उद्ष्ठि पावलो पावली हिरकणी गाठीत आहे. तसेच या महिला पतसंस्थेने नेहमीच ग्राहकांना सेवा व सुविधा पुरविण्याचा अटोकाट प्रयत्न केला आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या विविधांगी कला व सुप्तगुणांना वाव देवून वेळोवेळी सन्मानीत करून महिलांना स्वालंबी व आत्मनिर्भर करीत महिलांचे जिवनस्तर उचंावण्याचे कार्य करण्यात येत असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या 10 व्या आमसभा प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना संस्थेच्या अध्यक्षा अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी केले. यावेळी तालुक्यातील आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त शाळा समिती व बालमनावर संस्कार घडविणा-या विविध शाळेच्या षिक्षीका व षिक्षकांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.बुलडाणा जिल्हयातील सहकार क्षेत्रात अल्पावधीतच अग्रगण्य ठरलेल्या हिरकणी महिला अर्बन पंतस्थेची 10 वी सर्वसाधारण सभा दि. 18 सप्टेंबर रोजी स्थानीक मौनीबाबा संस्थानच्या भव्य सभागृहात थाटात पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्ष अॅड.सौ.वृषालीताई बोंद्रे हया होत्या. तर या कार्यक्रमाला बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे, श्री मुंगसाजी महाराज सह.पंतसस्थेचे अध्यक्ष दिपक देषमाने, पंचायत समितीचे सभापती जगन्नाथ पाटील, यांची प्रमुख उपस्थिीती होती. जिल्हाभरात विस्तारीत असलेल्या हिरकणी संस्थेच्या 13 शाखेचे संचालक, सल्लागार, शाखाधिकारी व अधिकारी, कर्मचारी, अल्पबचत प्रतिनीधी, भागधारकांची मोठया संख्येने उपस्थिीती होती.यावेळी बोलतांना अॅड.वृषालीताई बोंद्रे पुढे म्हणाल्या की, दैनंदीन जिवनात पारंपारीक सण, उत्सव,परंपरा इत्यादी चिकाटीने जपण्याचे काम महिला करतात. ग्रामीण व शहरी परीसरातील महिलांच्या कार्याची कुणीच दखल घेत नाही, मात्र हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातुुन महिलांना सामाजिक प्रवाहात आनुण त्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्याचे कार्य हिरकणीच्या माध्यमातुन आपण करीत आहोत, याचा मनस्वी आनंद होत आहे. तसेच बचत गटांच्या माध्यामातुन मदतीचा हात देत महिलांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य हिरकणी करीत आहे. हिरकणी महिला संस्थेच्या स्थापनेपासून 10 वर्षीय कार्याचा आढावा देत त्या म्हणाल्या, आजमीतीस जिल्हयात 13 शाखांचा विस्तार असुन 10 प्रस्तावीत शाखांना मान्यता प्राप्त झाली आहे. या हिरकणीच्या माध्यमातुन शेकडो कुटंूबांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत 50 शालेय विद्यार्थ्यांन दत्तक घेतले आहे. त्याचबरोबर संस्था आजरोजी विज बिल भरणा, क्यु.आर.व्दारे पेमेंट, आधार पेमेंट, सोने तारण कर्ज, मिनी ए.टी.एम., हिकरणी कपडा बॅंक, डिझीटल बॅंकींग, इत्यादी उपक्रमांबरेाबरच समाजितील व्यसन मुक्ती विरूध्द आंदोलनात्मक लढा देत आहे.हिरकणीने आर्थीक उलाढालीत सामाजिक बांधीलकी जोपासाली – दिपक देषमाने व्यासपिठावरून प्रमुुख पाहुणे म्हणुन बोलतांना श्री मुंगसाजी महाराज सह.पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक देषमाने म्हणाले, जिल्हयाच्या सहकारात केवळ 10 वर्षाच्या वाटचालीत हिकरणी महिला अर्बन पतसंस्था ही सर्वाधिक सुविधा पुरविणारी पतसंस्था म्हणुन नावारूपास आली आहे. कर्मयोगी तात्यासाहेब बांेद्रे यांच्या सुसंस्कृत जडणघडनीतुन वाटचाल करणा-या माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या पाउलावर पाउल टाकीत हिरकणी या पतसंस्थेच्या माध्यमातुन अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे समाज सेवेचे व्रत समर्थपणे पुढे नेत आहेत. आर्थीक संस्था चालवितांना सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे कार्य हिरकणीच्या विविध उपक्रमातुन निर्दषनास येत आहे. महिलांना आत्मनिर्भर व स्वालंबी करण्या बरोबरच सुषिक्षीत बेरोजगारांना रोजगार देवुन बेरोजगारी निर्मुलन, महिला, अबाल, वयोवृध्द, अपंग, रोग निदान षिबीरांच्या माध्यमातुन निरोगी समाज निर्मीतीचे कार्य हिरकणी करीत आहे. या महिला संस्थेच्या ठेवी 70 कोटीच्या जवळपास असुन ढोबळ नफा 1 कोटी 71 लाख रूपये इतका आजमितीस आहे. हिरकणीच्या विविध कार्य व उपक्रमांचा उल्लेख सुध्दा श्री मुंगसाजी महाराज सह.पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक देषमाने यांनी केला.  यावेळी हिकरणी पतसंस्थेच्या वतीने तालुक्यातील आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त शाळा समिती व बालमनावर संस्कार घडविणा-या विविध शाळेच्या षिक्षीका व षिक्षकांचा, जिल्हस्तरीय गौरी सजावट स्पर्धेतील विजेत्यांसह, 50 हुन अधिक स्पर्धकांचा प्रोत्साहनपर पुरस्कार देवुन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या क्यु.आर.कोडचे लोकार्पण यावेळी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर संस्थेच्या अध्यक्षा अॅड.सौ.वृषालीताई बोंद्रे यांच्यासह अतहासेद्यीन काझी, नंदकिषोर षिंदे, बाजीराव पाटील, दिपक हाके, पंढरीनाथ टेकाळे, आत्माराम देषमाने, नंदकिषोर पालवे, सौ. करूणाताई बोंद्रे, सौ. ज्योतीताई पडघान, आरतीताई पालवे, सौ. संगिताताई गाडेकर, सौ.विजयाताई खडसन, मोताळा नगराध्यक्षा सौ. माधुरीताई देषमुख, अमडापुर सरपंच सौ. वैषालीताई गवई, सौ. अर्चनाताई खबुतरे, जागृती महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ.जयश्रीताई देषमाने, सौ. देषमुख ताई, संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. त्रिवीणीताई हाके, संचालीका सौ. किर्तीताई षिसोदीया, सौ. संविताताई वाघमारे, सौ. विद्याताई देषमाने, सौ. अनिताताई घुगे, सौ. नेहाताई खरात, सौ.मालतीताई चवरे, सौ. गिताताई भोजवाणी, सौ. वंदनाताई इंगळे, सौ. मनिषाताई भुते, सौ. स्नेहाताई सावजी, श्रीमती प्रमिलाताई जाधव, सौ. शानुताई श्रीवास्तव, कौसर फातेमा बी ईरषाद खान, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप भावसार, अनुराधा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गायके, सरव्यस्थापक जे.बी.इंगळे, यांच्यासह जिल्हाभरात विस्तारीत असलेल्या हिरकणी संस्थेच्या 13 शाखेचे संचालक, सल्लागार, शाखाधिकारी व अधिकारी, कर्मचारी, अल्पबचत प्रतिनीधी, भागधारकांची मोठया संख्येने उपस्थिीती होती.

0 9 4 5 4 4
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *