विनोद वसु अकोट ता प्रतिनिधी रविवार दिनांक १८/०९/२०२२ रोजी महादेव संस्थान चोहोट्टा बाजार ता अकोट येथे पित्रुपक्ष निमित्ताने अखिल भारतीय गायत्री परिवार शाखा चोहोट्टा बाजार व अकोला तसेच शांतिकुंज हरिद्वार च्या तत्वानुसार सामुहिक श्राद्ध तर्पण पिंडदान व पंचकुंडी गायत्री महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसरातून आलेल्या दोनशे त्रेपन्न लोकांनी आपल्या पुर्वजांच्या सदगती करिता आहुती दिली . तसेच यानंतर गरोदर माता यांना गर्भसंस्कार करण्यात आले या वेळी चोहोट्टा बाजार येथील महादेव संस्थान परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते सामुहिक श्राद्ध तर्पण पिंडदान व पंचकुंडी गायत्री महायज्ञाचे पौरोहित्य अखिल भारतीय गायत्री परिवार हरिद्वार शाखा अकोला चे डॉ अजय उपाध्याय श्री किसनराव मोरे पाटील रजनी उपाध्याय यांनी केले योगिता सातपुते शितल सावके नीता दिवनाले बालिका शर्वरी दिवनाले गोकर्णा अंकुरकार भजन पाठ केले कार्यक्रमानंतर अखिल भारतीय गायत्री परिवार शाखा चोहोट्टा बाजार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते वरिल कार्यक्रमाचे आयोजन गायत्री परिवार चोहोट्टा बाजार चे अजाबराव बुंदे, रामदास वडाळ गुरुजी व गायत्री परिवार च्या वतिने करण्यात आले होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजयकुमार देशमुख यांनी केले गजानन गोंडुजी बुंदे राजुभाऊ वडाळ प्रकाश बुंदे संतोश बुंदे धनंजय बुंदे यांच्या सह महिला मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग होता चोहोट्टा बाजार येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले
Users Today : 11