स्वप्नातील ध्येय

Khozmaster
1 Min Read

दुनिया पाहतोय मी

समजुन घेतोय मी….

थोडं दुनियेचं, थोडं माझं

जीवन जगतोय मी !! १ !!

 

चालतोय मी

मार्ग काढतोय मी….

कडाक्याच्या उन्हात

थोडंसं भाजतोय मी !! २ !!

 

चालता-चालता 

थोडंसं थांबलोय मी….

सावलीच्या झाडाखाली

विसावा घेतलोय मी !! ३ !!

 

फांदीवरील कोकिळेचा सुर

ऐकतोय मी….

त्यात लागला डोळा

गाढ झोप घेतोय मी !! ४ !!

 

स्वप्न पाहतोय मी

राजा होतोय मी….

ध्येय दिसतय ते

जवळ जातोय मी !! ५ !!

 

कवि:- विजयपाल रावसाहेब शृंगारे

0 9 4 5 8 5
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *