लहान मुले पळून नेत आहेत चुकीच्या अफवा : ठाणेदार राहुल गोंदे लहान मुले पळून नेत असणाऱ्या या चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नये : ठाणेदार राहुल गोंदे

Khozmaster
2 Min Read

लहान मुले पळून नेत असणाऱ्या या चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नये : ठाणेदार राहुल गोंदे मेहकर :          सध्या लहान मुले पळून नेत असल्याची चुकीची अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ,यामुळे भिंतीचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात नुकसान होते कारण जानेफळ सारख्या गावामध्ये आनेक गावातील मुले, मुली शिक्षण घेण्यासाठी येत असतात पंरतु मुला-मुलीला पळून नेत असल्याची अफवा पसरवून देल्यामुळे भिंतीचे वातावरण झाले आहे.         याच अनुषंगाने आज २३ सप्टेंबर २०२२ रोजी सरस्वती विद्यालय जानेफळ येथे ठाणेदार राहुल गोंदे यांनी मुला- मुलींना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, लहान मुलांना किंवा लहान मुलींना पळून नेत असल्याची चुकीची अफवा पसरवली जात आहे. अशा अफवेला जनतेने बळी पडू नये, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ असेल किंवा इतर काही मुला-मुले पळून नेण्याबाबत व्हिडिओ असेल तर त्याची संपूर्ण खात्री केल्याशिवाय अफवा पसरू नये, अशी खोटी अफवा फसवण्यावर कायदेशीर कारवाई केल्या जाईल. कोणीही कायदा हातात घेऊ नये व गावामध्ये येणाऱ्या व्यक्तीस जमावाने मारहाण करु नये. काही अनुचित प्रकार घडल्यास पोलीस स्टेशनला संपर्क करावा. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या माहिती नुसार जिल्ह्यात अशी कोणतीही टोळी निदर्शनास आलेली नाही. याबाबत मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या जात आहे. याचा त्रास सामान्य लोकांना होत आहे त्यामुळे कोणीही कायदा हातात घेवू नये असे सरस्वती विद्यालयात मार्गदर्शन करताना ठाणेदार राहुल गोंदे यांनी सांगितले.        यावेळी जानेफळ पोलीस स्टेशनचे हेडमोहर टकले, जानेफळ टाऊन चे जमादार जतरकर, राजू गौंड तसेच सरस्वती विद्यालयाचे शिक्षक वृंद व प्राचार्य माळी सर, विद्यालयाचे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *