खामगाव : विधानसभा मतदार संघात नियमांची ऐशी तैशी.. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन. मतदान केंद्रात आणि मतदान केंद्राच्या आवारात 100 मीटर पर्यंत मोबाईल बंदी असताना सर्रास मोबाईलचा वापर करण्यात येत आहे. कर्मचारी सुध्दा मोबाईलचा वापर करीत आहे. तर नागरिक मतदान केल्यानंतर फोटो काढत आहे. याकडे पोलीस कर्मचारी आणि निडणुक कर्मचारी दुर्लक्ष करीत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला मोबाईल वापराची परवानगी नाही.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रात आणि केंद्राच्या 100 मीटरच्या आवारात कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, पेन कॅमेरा आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात आले आहे. याविषयी मतदारांनी दक्षता घेवून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
मतदान केंद्रात आणि केंद्राच्या 100 मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक सोडून निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी, वार्ताहर, मतदार, आदी कोणाही व्यक्तीला कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, पेन कॅमेरा, वायरलेट सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीने अनवधानाने ईलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत बाळगल्यास मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या अंतरावर ठेवून मतदान केंद्रात प्रवेश करावा. मतदान केंद्रावर किंवा मतमोजणी केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याबाबत सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आदेश असताना मतदान केंद्राच्या 100 मिटरच्या आत मोबाईलचा सर्रास वापर होत आहे. काही कर्मचारी सुध्दा मोबाईलचा सर्रास वापर करून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहे. तर काही ठीक निवडणूक केंद्रावर मतदान केल्यानंतर फोटो कडून फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येत आहे. एकीकडे मोबाईल बंदीचे आदेश द्यायचे दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा सर्रास वापर करून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेशांचे उल्लंघन करायचे हा कोणता न्याय? त्यामुळे अश्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का? आणि 100 मीटरच्या आवारात मोबाईल बंदी होणार का? की फक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याचे आदेश फक्त नावालाच आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला मोबाईल वापराची परवानगी नाही.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन : मतदान केंद्रावर मोबाईल बंदी असताना सर्रास वापर सुरू
Leave a comment