अनाथ अंध मुला सोबत टायगर ग्रुप ने केला वाढदिवस साजरा…

Khozmaster
2 Min Read

देवेंद्र सिरसाट.नागपूर.  अंध अनाथ बालकांच्या जीवनात पेरला आनंद..टायगर ग्रुप इंडिया चे संस्थापक वस्ताद जालिंदर जाधव ,अध्यक्ष डॉ.तानाजी जाधव , उपाध्यक्ष भैया साहेब बाडगर यांच्या मार्गदर्शनात टायगर गृप नेहमी सामजिक कार्यात चर्चेत असतो. या संघटनेत नागपूर जिल्हा शहर आणि ग्रामीण मध्ये दहा हजार मुले काम करतात,,त्यातच हिंगणा तालुका कार्याध्यक्ष आकाश भाऊ भांगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ज्ञानज्योती निवासी अंध विद्यालय, नागलवाडी हिंगणा येथे भेट देण्यात आली व अन्नदान आणि भेट वस्तू देऊन वाढदिवास साजरा करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख उपस्थित टायगर ग्रुप नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रशांतभाऊ नखाते, उपाध्यक्ष जितू दगडे जिल्हा कार्याध्यक्ष चंदू भाऊ वैद्य, जिल्हा संयोजक दिलीप भाऊ वाहाने, दक्षिण नागपूर सदस्य दर्शन जावळे, वाडी अध्यक्ष रवी अजित तसेच टायगर ग्रुप हिंगणा तालुका अध्यक्ष सागर कुकडे व उपाध्यक्ष रणजीत सिंग व सुरज सलाम यांच्या मार्गदर्शना खाली व सर्व टायगर ग्रुप सदस्यांच्या सहकार्य होते आकाश भाऊ तर्फे अंध विद्यालयात लहान मुलांना जेवण व खाऊ वाटप करन्यात आले असेच प्रतेक सदस्यांच्या वाढदिवसाला वायफळ खर्च न करता टायगर ग्रुप नागपूर जिल्हा रक्तदान,अन्नदान,वस्त्र दान,फळ वाटप, गौ शाळेत चारा वाटप,निराधार मुलांना शालेय वस्तू वाटप.अश्या प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम ग्रुप च्या माध्यमातून राबवत असतात..याच कार्याला प्रेरित होऊन असंख्य मुले मुली सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने टायगर ग्रुप नागपूर जिल्हा या सामाजिक संघटनेत जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ नखाते यांच्या नेतृत्वात प्रवेश घेत आहेत.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *