श्री.मंगेशभाऊ केनेकर व श्री.रक्षण देशमुख यांची महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी आलेगाव- रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा मानून तळागाळातील गोरगरीब लोकांना निरपेक्ष भावनेने मदत करण्यासाठी पातुर तालुक्यामध्ये मंगेश केनेकर व रक्षण देशमुख हे अखंडपणे धडपडत असतात.आपल्या भागातील कोणताही पेशंट असो त्याने संपर्क केला असता अकोला येथे आणून योग्य ते उपचार करण्यासाठी ते सदैव झटत असतात.जे रुग्ण पैशांअभावी उपचार घेऊ शकत नाहीत त्यांना आवश्यक ती आर्थिक मदत जमवून मुंबई येथे नामांकित रुग्णालयात रुग्णांवर योग्य ते उपचार करुन आतापर्यंत हजारो रुग्णांना सेवा देण्याचे पवित्र कार्य त्यांच्या हातून अखंडपणे घडत आहे.।त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री प्रवीणजी भोटकर सर यांनी त्यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करून त्यांना प्रदेश स्तरावर काम करण्याची संधी दिली.त्याबद्दल परिसरातील जनता व ज्या रुग्णांना त्यांनी मदत केली ते शुभेच्छा देत आहेत.त्याबद्दल भोटकर सरांचे आभार व्यक्त करत आहेत.व सेवेची ही संधी दिल्या बद्दल याच प्रमाणे रुग्णांना सेवा देत राहू असे विचार यावेळी दोघांनी व्यक्त केले .

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *