प्रतिनिधी विशाल गवई अकोट
प्रबोधन नगर येथे समाज क्रांती आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने संविधान चर्चा सत्र व समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड.श्रीकृष्ण टोबरे यांचा जाहिर सत्कार समारंभाचे आयोजन दि २५ ला करण्यात आले होते.संविधान चर्चा सत्राचे प्रमुख मार्गदर्शक हंसराज शेंडे हे होते.तर प्रदेशाध्यक्ष ॲड.श्रीकृष्ण टोबरे, प्रदेश उपाध्यक्ष बंडूदादा वानखडे, राज्य संघटक प्रा.दयावान गव्हाणे, राज्य कार्यकारणी सदस्य विष्णू वाडेकर,अकोला जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंप्राळे,भारत वानखडे, ज्ञानेश्वर खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवलाल सिरसाट यांनी तर आभार संजय खंडारे यांनी मानले.
संविधान हे प्रत्येक व्यक्तीला दिलेला मौलिक अधिकार आहे असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक हंसराज शेंडे यांनी केले.उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.संविधान चर्चा सत्राला संजय इंगळे,समाधान तायडे,गोपाल ओइंबे,समाधान वानखडे,दर्शन वर्घट,अनिल ढोके,शेखर वर्घट, प्रविण वाहुरवाघ, प्रमोद सिरसाट,धम्मज्योती अबगड,सतिष तेलगोटे, संविधान वानखडे आदी उपस्थित होते.