मास विक्री दुकानदारावर कारवाई कधी होणार?
प्रतिनिधी संतोष गवई अकोला
अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू हे ३० ते 35हजाराच्या लोकसंख्येचे गाव असून येथे विविध समाजाचे लोक येथे वास्तव्यास आहेत.. गेल्या काही दिवसापासून बोरगाव मंजू मुख्य रस्त्याला लागून चं लेंडी नाल्यावर
-
रस्त्याच्या कडेला लागूनच अवैद्य मास विक्री करीत असल्याचे चित्र आहे. याबाबत नागरिकांनी सार्वजनिक रित्या वारंवार प्रशासनाकडे चर्चा करूनही कोणतीही कठोर कारवाई झाली नसल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे. तसेच जणांवरावर लंपी सारख्या जीव घेणा आजार आल्यावर सुद्धा गोवंश विक्री करीत असल्याचे चित्र आहे. तसेच बोरगाव मंजू परिसरात जनावरांच्या चोरीच्या घटना सुद्धा वाढला असून. चोरी झालेले जनावर रातोरात कसाई पुरा भागात कापल्या जात असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे. तरीही मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई अवैध्यमास विक्रेत्यावर केली जात नसल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे.विशेष म्हणजे बोरगाव मंजू गावातच पोलीस स्टेशन आहे आहे. तरीसुद्धा बोरगाव मंजू पोलीस स्टेशन कडून या अवैध्यमास विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली नाही म्हणून. तक्रारदार न्यामतशाह आणि बोरगाव मंजू चे नागरिक यांनी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक व माननीय पोलीस निरीक्षक बोरगाव मंजू यांना निवेदन देण्यात आले. सात दिवसाच्या आत अवैध मास विकर्त्यावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी माहिती न्यामद शहा. यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले…..

Users Today : 0