आडगाव खुर्द येथे लंपी सदृश्य आजाराने गाईचा मृत्यू

Khozmaster
2 Min Read

 

प्रतिनिधी विशाल गवई अकोट

अकोट तालुक्यातील अडगाव खुर्द येथील श्रीकृष्ण ज्ञानदेव गवई यांची गाय लंम्पि आजारामुळे नुकताच मृत्यू झाल्याची घटना २५ सप्टेंबर रोज घडली या घटनेमुळे पशुपालकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लंम्पि रोगामुळे गाईचा मृत्यू झाल्याने श्रीकृष्ण गवई यांचे २०ते २५ हजार रुपयाचे नुकसान झाले असून सदर शेतकरी हा हवालदील झाला आहे. आधीच शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे पावसाळ्यामुळे पीक उत्पादनात घट आदीमुळे मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यातच आता आलेल्या जनावरांवर आलेल्या लंम्पी व्हायरसमुळे जनावरे दगावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेत यामुळे पशुपालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अडगाव खुर्द परिसरातील जनावरांना लंम्पि रोगाची लागण झाली असून. बहुतांश जनावरांना औषध उपचार केला गेला आहे. काही जनावरे थोड्या प्रमाणात सुधारली तर काही जनावरे या रोगामुळे गलथान झाले आहेत अचानक आलेल्या लंम्पि रोगामुळे शेतकरी गोंधळात असून आपली जनावर वाचवण्यासाठी धावपळ करीत आहेत. लंम्पीची लागण होताच गाईवर १० ते१५ दिवसां पासून औषध उपचार करण्यात आले. परंतु काही सुधारणा होत नव्हती आणि अखेर गाईचा मृत्यू झाला. शासनाने त्वरित गवई यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी श्रीकृष्ण गवई यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य अमण गवई समाजसेवक प्रमोद सोनोने, महेंद्र गवई, प्रफुल लायडे,यांनी तात्काळ धाव घेऊन संबंधित अधिकारी यांना कळवून पंचनामा करून मदतीची मागणी केली आहे.

 

*प्रतिक्रिया*

 

दहा ते पंधरा दिवसांपासून गाय आजारी होती.यावर गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांनी उपचार केले, परंतु रविवारी सकाळी अचानक गाईचा मृत्यू झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.या गाईच्या दुधामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होतो.त्यामुळे शासनाने लक्ष देऊन आर्थिक मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.

श्रीकृष्ण ज्ञानदेव गवई

0 9 4 5 8 6
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *