मंत्री अब्दुल सत्तार यांनी मागवले १०० एसटी बसचे कोटेशन;जि.प.स.गोपीचंद जाधव यांची माहिती

Khozmaster
1 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी 100 एसटी बसचे कोटेशन मागवले औरंगाबाद : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यात शक्ती प्रदर्शनासाठी उद्धवसेना , शिंदेसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे . त्यात औरंगाबाद जिल्ह्यातून २० हजार लोक आणण्याचे उद्दिष्ट मातोश्रीवरून माजी खासदार चंद्रकांत खैरे , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आले आहे . एवढ्या लोकांना नेण्या – आणण्यासाठी किमान दोन कोटी रुपये आणि चार हजार चारचाकी लागणार आहेत . त्यासाठी धावपळ सुरू झाली आहे . शिंदे गटाने गर्दीसाठी मेळावे घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे . मात्र , किती लोक न्यायचे , याचे टार्गेट पुढील आठवड्यात निश्चित करण्याचे ठरवले आहे . उद्धव गटाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की , एका चारचाकीत पाच जण गृहीत धरले तरी चार हजार गाड्या लागतील . प्रत्येक गाडीचा इंधन खर्च ५ हजार म्हणजे एकूणात २ कोटी रुपये लागतील . सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने चारचाकी जमवण्यासाठी सर्व शक्ती त्यासाठी पणाला लावण्यात आली आहे . दरम्यान , शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट , जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी गर्दीचा अंदाज घेण्यासाठी हिंदू गर्वगर्जना यात्रेच्या नावावर मेळावे सुरू केले आहेत अशी माहिती जि.प सदस्य गोपीचंद जाधव औरंगाबाद,सोयगाव यांनी बोलताना सांगितले.

0 9 4 5 8 6
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *