नवरात्र उत्सव 2022 निमित्त महाराष्ट्रातील सर्व माता – भगिनींसाठी मोफत आरोग्य शिबीर माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” या कार्यक्रमाचे उद्घाटन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र नं. 5 येथे मा. आयुक्त सो. व मा. महापौर यांच्या आदेशानुसार करण्यात आले. यावेळी महापौर सूर्यवंशी साहेब , आरोग्य केंद्रातील मेडिकल ऑफिसर डॉ अल्का तोडकर, डॉ. मधुरा जोशी व डॉ. जुल्फान अत्तार, हळीगळे सर , सर्व स्टाफ नर्सेस, लॅब टेक्निशियन, आशा वर्कर आणि नागरिक उपस्थित होते. हळीगळे सर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवत माता सुरक्षित तर घर सुरक्षित तसेच आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले ह मोहिम 26 ऑक्टोंबर पर्यंत 18 वर्षांवरील सर्व महिलांचे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दवाखाने, आरोग्य केंद्र येथे रक्त तपासणी, आरोग्य तपासणी व मोफत उपचार तरी सर्व महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन मा. महापौर साहेबांनी केले….
Users Today : 25