भेसळ भगरीबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन

Khozmaster
2 Min Read

अकोला – नवरात्र उत्सवात भाविक मोठया प्रमाणात उपवास करतात. उपवासामध्ये भगरीचे वेगवेगळे पदार्थ करून सेवन करण्याचे प्रमाण अधिक असतो. भेसळ भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना निर्देशात आले आहे. याकरीता भेसळ भगर पदार्थाचे सेवन करताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सा.द. तेरकर यांनी केले.

भगर तयार करतांना प्रामुख्याने वरई, सावा, बर्टी व कोद्रा या धान्याचे वापर करतात. भगर तयार करण्यासाठी वापरात येणारे धान्यांवरून भगरचे प्रकार पडतात. उदा. वरई भगर, सावा भगर, वर्टी भगर, कोद्रा भगर ई. भगरीमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन असतात तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशियम या सारखी खनीजे असतात. मधुमेही रुग्णांसाठी पण भगर हा उत्तम आहार आहे. अशी सत्वगुणी भगर आरोग्याला अपायकारक का ठरते आहे. या प्रकरणांचा अन्न व औषध प्रशासनाने अभ्यास केला असता भगरीवर मोठया प्रमाणात बुरशीचे प्रादुर्भाव होते. ज्यामुळे त्याच्यावर विषद्रव्ये तयार होतात. 25 ते 31 सेलसियस तापमान व आर्द्रता हे बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशी बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होवु शकते.

भगर खातांना काय काळजी घ्यावी :

बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतो पाकीटबंद भगर घ्या. पाकीटबंद भगरचे लेबल तपासावे. लेबलवर पॅकींग दिनांक व बेस्ट बिफोर तपासुनच वापर करा. भगर साठवतांना ती स्वच्छ कोरड्या डब्यात ठेवा. जेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. शक्यतो भगरीचे पीठ आणु नका, भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्यावे. जास्त दिवस पीठ साठवु नये.

भगर विक्रेत्यांना सुचना :

भगर विक्रेत्यांनी शक्यतो पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर विक्री करताना घाउक विक्रेत्यांकडुन पावती घ्यावी. भगरीचे पॅकेटवर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्रमांक, पॅकींग दिनांक, बेस्ट बिफोर तारीख असल्याची खात्री करावी. मुदत बाह्य भगर किंवा भगर पीठाची विक्री करून नये. कमी दर्जाची भगर किंवा इतर अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

0 6 2 3 5 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *