महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून तो राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला आहे. नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत राज्याचा कारभार हे एकनाथ शिंदे हेचं सांभाळणार आहेत.. आज राजीनामा सुपूर्द करतेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. दरम्यान आता मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं असताना उद्या म्हणजेच बुधवारी मुख्यमंत्री पदी कोण असेल याची घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच मुख्यमंत्री कोण असेल यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलं.. भारतीय जनता पार्टीला 132 जागांवर विजय मिळवला असून शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागांवर विजय मिळवला आहे. अजित पवारांच्या पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाशी बोलून आम्ही योग्य तो निर्णय घेऊन असं एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेळोवेळी सांगितलं आहे.. 26 नोव्हेंबर ही विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र नवे मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत राज्याचा कारभार शिंदेच पाहणार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते नवं सरकार स्थापन होईपर्यंत कारभार संभाळणार आहेत.. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच विधानसभा बरखास्त होते.. शिंदेंनी राजीनामा दिल्याने आता पुढील सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून ही तांत्रिक बाब असली तर सत्ता स्थापनेसाठी फार महत्त्वाची घडामोड आहे. दरम्यान महायुतीच्या सरकारमध्ये कोणाकोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष द्या .