सन्मान कर्तृत्वाचा , जागर स्त्री शक्तीचा साख

Khozmaster
3 Min Read

चिखली ÷  ” सन्मान कर्तृत्वाचा , जागर स्त्री शक्तीचा “आ सौ श्वेताताई महाले पाटील यांचा नवरात्रोत्सवातील उपक्रम कर्तृत्ववान नारीच्या सन्मानाच्या घटस्थापनेची दुसरी माळ आ. सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीने चिखली विधानसभा मतदारसंघातील ज्या महिलांनी उत्कृष्ट , आगळेवेगळे व इतरांसाठी प्रेरणादायी कार्य केले अशा नारी शक्तीचा नवरात्रीत नऊ महिलांचा सन्मान करण्यात येत आहे .        आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या संकल्पनेतून त्या अनुषंगाने आजच्या दि 16/9/2022 पहिल्या माळेला साखळी बु येथील योगिता ज्ञानेश्वर डांगे या कर्तृत्ववान महिलेचा साडी चोळी आणि स्मृतचिन्ह देवून या नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला

योगिता ज्ञानेश्वर डांगे यांचा परिचय

नाव-योगिता ज्ञानेश्वर डांगे वय-42 वर्ष राहणार साखळी बु. ता.जि. बुलडाणा कार्य-आशा सेविका,बाल संस्कार केंद्राच्या माध्यमातून 2.5वर्षे ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पूर्वशिक्षणपा‌ र्श्वभूमी-पतीची हृदय विकाराची शस्त्रक्रिया झाल्यावर खचून न जाता योगिता डांगे यांनी आपल्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालवला . त्यातुन मार्ग काढत त्यांनी काही दिवस मोलमजुरी करून दिवस काढले. शासनाने आशा सेविका हे पद काढले या पदावर ग्राम सभेच्या माध्यमातून त्यांची निवड झाली.सन 2013 पासून त्या आशा सेविकेचे काम आपल्या इतर 4 सेविकांबरोबर करत आहे.व बाल संस्कार केंद्राच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षपासून गावातील कित्येक गरीब मुलांना नाममात्र फी घेऊन मोठमोठ्या शाळांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना नर्सरी, प्ले ग्रुप,के. जी.पेक्षा दर्जेदार शिक्षण देत आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी चांगले कार्य केले आहे. तसेच इतर मुलांना योग्य मार्गदर्शन करत असताना त्यांनी त्यांच्या दोन मुलांना सुद्धा उच्चशिक्षित केले.मोठा मुलगा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या सर्व बाबीची दखल घेऊन आपल्या लाडक्या आमदार सौ श्वेताताई महाले यांनी योगिता डांगे यांची कर्तत्ववान महिला म्हणून त्याची निवड केली आहे

  अशा या नारीशक्तीचा आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी साडी चोळी , मानचिन्ह , पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून ” सन्मान कर्तृत्वाचा , जागर स्त्री शक्तीचा ” या उपक्रमाअंतर्गत कर्तृत्ववान नारीचा सन्मानाच्या पहिल्या माळेला सत्कार करून आ सौ श्वेताताई महाले पाटील यांचा वतीने सुरू करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवाची घटस्थापना केली आहे .             नवरात्रोत्सवातील उपक्रम कर्तृत्ववान नारीच्या सन्मानाच्या घटस्थापनेची सातवी माळनिमित्त लोकप्रिय आमदार सौ श्वेताताई महाले पाटिल यांच्या हस्ते नारीशक्तीचा सत्कार समारंभासाठी सौ सिंधुताई तायडे माजी सभापती पंचायत समिती, श्री अंकुशराव पाटील,

सौ भोसले तालुका अध्यक्षा भाजप महिला आघाडी, सौ निताताई सोळंकी तालुका अध्यक्षा भाजप महिला किसान आघाडी,सरपंच सौ.सुनीताताई भास्कर भगत

0 9 4 5 8 6
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *