प्रतिनिधी:- शिवाजी उदार
मेरा खुर्द:- गावच्या समस्या ज्या ठिकाणावरून सोडविल्या जातात तीच ग्रामपंचायत आता समस्यांच्या विळख्यात अडकलेली आहे.दूरदूरपर्यंत प्रसिद्ध असलेले मेरा खुर्द हे गाव व या गावाला मिळालेली प्रसिद्धी औरंगाबाद नागपूर हायवे वर असलेली चौकी याच चौकी मुळे मेरा खुर्द ची ओळख दूरपर्यंत मेरा चौकी म्हणून अशी झालेली आहे.आणि याच मेरा चौकीवर साखरखेर्डा रोडवर ग्रामपंचायत ची इमारत परंतु ती इमारत आता समस्यांच्या विळख्यात सापडली आहे.कारण रोडच्या उजव्या हाताला ग्रामपंचायत इमारत आहे तर त्याच इमारतीच्या समोरच डाव्या हाताला घाणीचे साम्राज्य पसरले आहे.एकीकडे सरकार स्वच्छता अभियान वर लाखो-करोडो रुपये खर्च करीत आहे, आणि याच स्वच्छता अभियानाला अपवाद असलेले मेरा खुर्द हे गाव आणि त्याला जबाबदार असलेली ग्रामपंचायत व मेरा खुर्द प्रशासन, मेरा खुर्द गावात प्रवेश करतानाच ही घाण आहे जणू काही प्रवेश करणाऱ्यांच्या स्वागतासाठीच ही घाण आहे.कारण मेरा खुर्द चे नाक असलेले मेरा फाटा( मेरा चौकी) या ठिकाणी ही घाण आहे.विशेष म्हणजे सरपंच, ग्रामसेवक, व ग्रामपंचायत सदस्य हे दररोज जातायेता ही घाण बघतात आणि बघून फक्त सुस्त बसतात याविरुद्ध कोणीही आवाज उचलत नाही.या घाणीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण या ठिकाणी दररोज हजारो प्रवासी जाणे-येणे करतात म्हणून ग्रामपंचायतीने ताबडतोब या घाणीची विल्हेवाट लावावी.