रिसोड, प्रतिनिधी पुनम क्लिनिक ता. रिसोड,जि. वाशिम
.ता.वेळ – दि 28सप्टेबर चे 20.30 वा ते 22.00 वा दरम्यान संबंधित हॉस्पिटल वर पाळत ठेवून रेड करण्यात आली यावेळी प्राप्त माहितीनुसार उपरोक्त क्लिनिक आसेगाव पेन तालुका रिसोड यांचे संचालक विरुद्ध 29 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता झालेल्या कारवाईनुसार,आरोपी इसमाकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी किंवा प्रमाणपत्र नसताना तसेच महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल किंवा इंडियन मेडिकल कॉन्सिल कडे त्याचे नाव नोंदविलेले नसताना सुद्धा तो वैद्यकीय व्यवसाय करून लोकांच्या जीवाशी खेळताना मिळून आला. स्वतः डॉक्टर असल्याचे सांगत होता. तसेच सदर आरोपी कडे कोणतीही वैद्यकीय पद्धतीची व्यवसाय करण्यासाठी पदवी किंवा प्रमाणपत्र नसताना त्याने स्वतः च्या नावापुढे डॉक्टर पवन प्र. खानझोडे असे लिहून लोकांची फसवणूक करीत होता. अशा प्रकारचे निदर्शनास आले.
भरारी पथकामध्ये PSI शिल्पा सुरगडे, HCचव्हाण, pc महेश परमेश्वरे, प्रवीण धवणे तसेच डॉ. जे.बी. उमाळे, डॉ. आर.पी. बेले,एन. विजय नाईकवाडे,पवार, एन, व्ही राठोड, पी.ए. नागलकर तालुका स्तरीय बोगस डॉक्टर कार्यवाही समिती मार्गदर्शन अधिकारी देवेंद्रसिंह ठाकूर,पोलीस निरीक्षक, पो.स्टे. रिसोड यांनी काम पाहिले.
Users Today : 0