जागर संविधानाचा’ व्याख्यानमाला
पुष्प पंधरावे
वाशिम ; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित व प्रभू श्री रामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळ तोंडगाव द्वारा संचलित
मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधानावर प्रकाश टाकण्यासाठी ‘जागर संविधानाचा’ या व्याख्यानमालेचा कार्यक्रम *दि.26 नोव्हेंबर 2022 ते 26 जानेवारी 2023* या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने आयोजित केला आहे. दर आठवड्यातील शनिवार व रविवार या दिवशी *भारतीय संविधानातील 22 भागातील एका एका भागावर मार्गदर्शन होत आहे.
या व्याख्यानमालेचे पंधरावे पुष्प दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी प्रा.डॉ.रमेश वाघमारे, लोकप्रशासन विभाग प्रमुख, गोदावरी कला महाविद्यालय अंबड जिल्हा जालना यांनी गुफंले. पंधराव्या पुष्पा मध्ये भारतीय संविधानातील भाग एकोणीस संकिर्ण आणि भाग -वीस संविधानाची सुधारणा या भागांवर प्रकाश टाकला. भारतीय संविधानातील भाग 19 मध्ये कलम 361 ते 367 अंतर्गत राज्यघटनेतील वेगवेगळ्या व विविध घटकावरील संकीर्ण तरतुदी दिलेल्या आहेत .
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे या संविधानामुळे भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक असताना सुद्धा प्रबळ अशी लोकशाही टिकून आहे. भारतीय संविधानातील भाग 19 मध्ये राष्ट्रपती ,राज्यपाल व राज्यप्रमुख यां पदांना संरक्षण दिलेले आहे.तसेच संसद व राज्य विधिमंडळ यांच्या कामकाज वृत्तांताच्या प्रकाशनास सुद्धा संरक्षण दिलले आहे . भारतीय संविधानातील भाग 19 हा संपूर्ण महत्वपूर्ण तरतुदीचा म्हणून ओळखला जातो संविधानातील कलम 367 हे वेगवेगळ्या कायदे व अधिनियमाचा अर्थ लावण्यासाठी आहे. सद्यस्थितीत 370 कलम रद्द करून जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेऊन त्याला इतर राज्याप्रमाणे सामान्य बनविण्यासाठी 367 (4) या कलमाचा आधार घेतला आहे. भारतीय संविधानातील भाग 20 मध्ये कलम 368 नुसार भारतीय राज्यघटने मध्ये करण्यात येणाऱ्या घटनादुरुस्ती संबंधी तरतुदी आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये आतापर्यंत 105 घटना दुरुस्त्या झालेले आहेत. राज्यघटना कितीही ताठर असली तरी वेळोवेळी समाजातील बदलाप्रमाणे थोडाफार बदल करणे आवश्यक आहे परंतु घटनादुरुस्ती करताना संविधानाच्या मूळ ढाच्याला किंवा मूलभूत संरचनेला धक्का लागता कामा नये असे मत मत डॉ.वाघमारे यांनी व्यक्त केले.
सदर व्याख्यानमालेचे प्रास्ताविक , आभार प्रदर्शन आयोजक प्रा.डॉ.विलास गायकवाड यांनी केले. सदर व्याख्यानाला महाराष्ट्रातील संविधानाचे अभ्यासक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 25