खोदकाम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर भिंत कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी  स्वप्निल गणगणे
मूर्तिजापूर –   येथील जुन्या हिरपूर रोडवरील सुभाष नगराच्या समोरील मोठ्या नालीचे बांधकाम सुरू असतांना आज सायंकाळी साडेचारच्या दरम्यान नालीची जुनी भिंत कोसळ्याने मलब्याखाली दबून दोन मजूर ठार, तर एक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली.
शहराच्या जुनी वस्ती भागातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या या मोठ्या नालीचे बांधकाम काही दिवसांपासून सुरू आहे. दलीतवस्ती सुधार योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या या कामावरील मजूर खोदकाम करत असतांना या नालीची जुनी भिंत कोसळली. त्या भिंतीच्या मलब्याखाली दबून लकडगंज मधील सागर नरेश सोळंके वय २४ वर्ष व लकी लखन पचारे वय २० वर्ष हे दोघे गतप्राण झाले. लकडगंज मधीलच साबीर शाह मोहंमद शाह वय २६ वर्ष हे गंभीररित्या जखमी झाले. तिघांनाही वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या सदस्यांनी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रूग्णालयात आणले. साबीर शाह अत्यवस्थ असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्याला हलविण्यात आले. सागर व लकी यांचे मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आले.
0 9 4 7 1 3
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *