संत बायजाबाई पुण्यतिथी व यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न 20 क्विंटल महाप्रसादाचे आयोजन

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
अकोट तालुक्यातील संताची नगरी म्हणून ओळख असलेल्या मुंडगाव येथे सालाबाद प्रमाणे नुकतीच संत बायजाबाई यांची ८३ वी पुण्यतिथी व यात्रे निमित्य भागवत कथा सपन्न झाली. ह्या कार्यक्रमाची सुरवात दि.१५ जानेवारी पासून ते २२ जानेवारीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये ह.भ.प.आशिष महाराज खलोकार हे दुपारी १ ते ५ या कालावधीत कथा प्रवचन करीत होते .सोबतच मृदुंगाचार्य ह.भ.प. सागर महाराज मिसळकर, गायनाचार्य ह.भ.प.कपिल महाराज वाळके, ह.भ.प.नितीन महाराज घोडीले, ह.भ.प.सुदर्शन महाराज खडसने,हे असून यामध्ये ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज गयी, ह.भ.प.गोपाल महाराज अंबळ्कार, ह.भ.प. दुर्गाश्री महाराज गिरी, ह.भ.प.हिरालाल महाराज काळमेघ, ह.भ.प.रुख्मिणी अनंतराव वारोकार, ह.भ.प.आशिष महाराज खलोकार, ह.भ.प.भारूळ सम्राट रघुनाथ महाराज,यांचे दररोज रात्री ८ ते १० दरम्यान हरिकीर्तन होत होते .व महाप्रसादाच्या दिवशी ह.भ.प.गोपाल महाराज भुस्कट,यांचे काल्याचे कीर्तन करण्यात आले. व श्रीकृष्ण अवलिया ढोलाचे भजन मंडळ मुंडगाव यांच्या हस्ते करण्यात आले.या यात्रे मध्ये सहभागी झालेल्या सर्व दिंडीना नारळ,दुपट्टा, व मानधन देण्यात आले .या मध्ये जास्तीत जास्त दिंड्यांनी सहभाग घेतला होता. व महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ मोठ्या उत्साहात घेण्यात आला. व आयोजक संत बायजाबाई यात्रासामिती व गावकरी मंडळी यांचे मोठे सहकार्य लाभले .
0 9 4 5 5 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *