हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शहरात मोटरसायकल रॅली

Khozmaster
1 Min Read
वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर
वाशिम – हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडी, युवासेना व युवतीसेना पदाधिकार्‍यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोटर सायकल रॅली ही शहरात काढलेल्या आली. या मोटार सायकल रॅलीला शिवसैनिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या
  रॅलीचा प्रारंभ सकाळी ११ :०० वाजता जिजाऊ सभापती निवासस्थानावरुन करण्यात आला होता. यावेळी शिवसेना संस्थापक तथा सामना या वृत्तपत्राचे संपादक व्यंगचित्रकार भारतीय राजकारणी म्हणून ख्याती असलेले वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करून रॅलीचा प्रारंभ सुरुवात करण्यात आली. ही रॅली पोस्ट ऑफीस, पुसद नाका, मन्नासिंह चौक, माहुरवेश, इंदिरा चौक, ध्रुव चौक, राजनी चौक, न.प. चौक, दंडे चौक, टिळक चौक, सुभाष चौक, बालु चौक, शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्टॅन्ड अशी मार्गस्थ होत जिजाऊ कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी यांच्यासह जिल्हयातील शिवसेनेचे आजीमाजी पदाधिकारी, नगरसेवक, शिवसैनिक, युवासैनिक व महिला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रॅलीनिमित्त पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *