मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृह येथे पालक सभा संपन्न

Khozmaster
2 Min Read
वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादूर
वाशिम ; दि.२२ जानेवारी रोजी मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय  मुलीचे शासकीय वस्तीगृह सिव्हीलाईन वाशिम येथे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व पालक सभा आयोजित केली जाते. त्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रथम सत्रा मध्ये पालक सभा घेण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक वस्तीगृहाच्या गृहपालीका श्रीमती. वर्षा लाकडे , प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या स्वाती कुलकर्णी मॅडम (मुख्याध्यापिका) राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय वाशिम, गृहपाल शेषराव इंगोले, पालक प्रतिनिधी गोवर्धन इंगळे , महिला प्रतिनिधी म्हणून वच्‍लाबाई जाधव , माझी विद्यार्थिनी माधुरी बहादुरे, कल्याणी कांबळे, सलोणी पाईकराव, पूजा डोंगरे जनाबाई रोकडे ,प्रियंका वानखेडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते थोर महापुरुष यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या पालक सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या व पालकांचे मनोगत घेण्यात आले. यामध्ये पूजा डोंगरे, सलोनी पाईकराव, कल्याणी धाराशिव, पाकल गोवर्धन इंगळे यांनी वस्तीगृहातील वातावरण व्यवस्था व संपूर्ण आयोजन नियोजन सोई सुविधा यावर आपले मत व्यक्त केले. यांच्यासह इतरही मुलींनी व पलक्यानी आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी मॅडम यांनी वस्तीगृहातील शिक्षण सोईसुविधा व लाभार्थी विद्यार्थिनींना विविध विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन कोमल राठोड व पल्लवी वाढवे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याणी कांबळे या विद्यार्थिनीने केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्तीगृहाच्या गृहपालीका वर्षा लाकडा मॅडम , प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी मॅडम, वच्छलाबाई जाधव, गोवर्धन इंगळे यांची उपस्थिती होती.  या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन वस्तीगृहाच्या गृहपालीका वर्षा लाकडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मावती भगत व कल्याणी कांबळे या विद्यार्थिनी केले.
उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रज्ञा लोहपंचांग या विद्यार्थिनी मानले. या कार्यक्रमाला वस्तीगृहातील विद्यार्थिनी व त्यांचे आई वडील यांची बहुसंख्येने  उपस्थिती होती.
0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *