प्रजासत्ताक दिनी पातुर शहरात भव्य पुरुष व महिला मॅरेथॉन स्पर्धा बाळासाहेबांची शिवसेना व श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅरेथॉनचे आयोजन

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर :– शहरात गेल्या अनेक दशकापासून तरुण युवकांना योग्य मार्गदर्शन व शारीरिक दृष्ट्या प्रबळ बनवण्याचे कार्य श्री सिदाजी महाराज व्यायामशाळेचे मंगेश गाडगे व मित्रपरिवार यांनी हाती घेतले आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व तरुण युवकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व देशहितासाठी महत्त्वाचे असून याकरिता गुणवंत विद्यार्थ्यांचे, पातूर शहरातील नामांकित पैलवानांचे तसेच, पत्रकार व क्रीडापटूंचे शहीद पिता, व देशाच्या संरक्षणासाठी संपूर्ण आयुष्य सेवा देणाऱ्या माजी सैनिक संघटनेचा सत्कार ठेवण्यात आले आहेत या भव्य मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुलाचा गट प्रथम बक्षीस 11000 द्वितीय बक्षीस 5000 व तृतीय क्रमांकाचे बक्षीस 3000 व मुलींचा गट प्रथम बक्षीस 7000, द्वीतिय बक्षीस 3000, व तुतीय बक्षीस 2000, असे ठेवले आहे ही स्पर्धा खानापूर रोड वर एकूण दहा किलोमीटर अंतराची ठेवली आहे तर महिला गटा करिता 1600 मिटर तुळसाबाई काल विद्यालय मैदानावर ठेवली आहे, स्पर्धेमध्ये प्रमुख उपस्थिती गोपीकिशनजी बाजोरिया बाळासाहेबांची शिवसेना संपर्कप्रमुख तथा उपनेते आमदार विधान परिषद अकोला,जिल्हाप्रमुख विठ्ठल सरफ, आमदार हिंगोली विप्लव बाजोरिया, यांची उपस्थिती राहणार असून बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नव्याने पातुर शहर प्रमुख पदी विराजमान झालेले पवन तायडे यांच्या संकल्पनेतून व संत सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन ठेवले असून संपूर्ण विद्यार्थी व तरुण युवकांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन पैलवान मंगेश गाडगे यांनी केले आहे.

 

0 9 4 7 1 3
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *