प्रतिनिधी संतोष गवई अकोला . तालुक्यातील बोरगाव मंजू येथे जलसंपदा विभागाच्या आवारात काँक्रीटचे रस्त्याचे काम थातुर मातूर व निष्कृष्ट दर्जाचे काम करून देयक लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार समोर आला आहे उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग वि . न. कुलकर्णी साहेब कर्तव्यावर असून सुद्धा हा प्रकार घडत आहे तसेच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांसाठी वसाहत आहे व या वसाहतीच्या आवारात काँक्रीटचे रस्तेचे काम काही दिवसापासून सुरू आहे मात्र कंत्राटदार मनमानी पद्धतीने थातूर मातूर काम करून देयक हडकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे काँक्रीट रस्त्याच्या कामात माती मिसरीत मुरूम टाकून लोखंडी गजाचा पिंजरा न टाकता व कमी भावाचे ढक्कन कमपनी चे सिमेंट व गिट्टी सिमेंट चा कमी प्रमाणात वापर करून तसेच कंत्राटदार हे अंदाजपत्रकानुसार काम करण्याऐवजी मनमानी पद्धतीने काँक्रीट रस्ताचे निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे त्यामुळे कंत्रादाराला अभय कोणाचे असा प्रश्न नागरिकांमध्ये होत आहे कुलकर्णी साहेब आणि कॉन्ट्रॅक्टदार यांची हात मिळणे होत असल्याचे चित्र दिसून येतआहे तसेच आमचे प्रतिनिधी पाटबंधारे ऑफिसला गेले असता वरिष्ठ अधिकारी शैलेश देशमुख ऑफिसला हजर नसून यांना फोन द्वारे विचारना केली असता वरिष्ठ अधिकारी हे उडवा उडीचे उत्तर आमच्या प्रतिनिधींना देत आहेत तरी महोदय याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन व चौकशी करुन लाखो रुपयाचा भ्रष्टाचार उघड होईल तरी वरिष्ठ अधिकारी यांनी काँग्रेट रस्त्याची चौकशी हे करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी व काही आढळल्यास कॉन्ट्रॅक्टदार यांचे परवाना रद्द करण्यात यावे व कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
Users Today : 2