प्रतिनीधी रवि मगर_मोताळा तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपळगाव नाथ येथील एका शेतकर्याच्या मुलीने संधीचे सोने केले आहे. प्रत्येक जण काही ना काही स्वप्नं उराशी बाळगून वाटचाल करीत असतात. त्यामधूनच एक पिंपळगाव नाथ येथील कु. पुजा एकनाथ कडूकार हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी द्वारे उद्योग निरीक्षक पद मिळवले आहे.त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्पर्धा आणि परीक्षा या शब्दातुनच स्पर्धा परीक्षा ही संकल्पना बनलेली आहे. स्पर्धा परीक्षेबद्दल अज्ञान आणि भ्रामक दृष्टीकोनामुळे ही संकल्पना मनात आल्यानंतर अक्षरषः जिव घाबरून जातो. मनात असंख्य भितीचे वादळ भरून येतात. आत्मविष्वासाची कुठलीही खुनगाठ न बांधलेले मनं भितीच्या शंकेने ग्रासुन जातं. स्पर्धा आणि आपण हि संकल्पनाच बसेनाशी होते. स्पर्धा म्हणजे काय.तीचे स्वरूप कसे असते. त्यात कुठल्या स्वरूपाचे प्रश्न येतात.त्यासाठी अभ्यास कसा करावा लागतो. त्यासाठी व्यक्तीमत्व कसे घडवावे.असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात शिरकाव करतात आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण पास होऊ शकतो काय, या भयशंकेनेच तो स्पर्धा परीक्षेपासुन दुर व्हायला लागतो. एकंदरीत संपुर्ण विद्याथ्र्यांच्या बाबतीत अशी स्पष्टोक्ती देणे सन्मानजनक ठरणार नाही. अनेेेक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बघितल्यास स्पर्धसाठीचे योग्य वातावरण, मार्गदर्शन, परिस्थिती, वाटचाल, दिशा, यांच्या सहवासात स्पर्धा परीक्षेची भिती कमी झालेली आढळते आणि स्पर्धा परीक्षा हाच आपल्या जीवनाचा राजमार्ग अशी संकल्पना त्यांच्या मनात बळावते व स्पर्धा परीक्षेबद्दल आत्मविश्वास वाढतो. पुजाचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण मोताळा येथील स्व. बबनराव देशपांडे विद्यालयात झाले. पुजाने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाने घवघवीत यश संपादन केले आहे. जेमतेम शिक्षण झालेल्या आणि कोणीही मार्गदर्शक नसलेल्या कुटुंबातून तिने यश संपादन केल्याने आई-वडिलांसह परिसरातील लोकांच्या आनंदाला उधाण आले आहे.सेवेत दाखल झाल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याला मदत करण्याचा प्रयत्न करीत राहील अशी भावना तिने व्यक्त केली. शिवाय सर्वच पालकांनी मुलांबरोबर मुलींनाही शिक्षण दिले पाहिजे अशी इच्छाही व्यक्त केली. सध्याची जगाची वाटचाल ही स्पर्धात्मक आहे. सारं जग स्पर्धच्या लयीने एकमेकांसोबत चाललेले आहे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येकांशी स्पर्धा करण्यासाठी धजावलेला आहे जणु स्पर्धा परीक्षा हाच त्यांचा जिवनाचा मार्ग आहे की काय असे वाटायला लागले आहे. स्पर्धा परीक्षा ही आजच्या काळाची गरज आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही कारण स्पर्धा केल्याशिवाय यश देखील मिळणार नाही. परंतु स्पर्धा करीत असतांना सामाजिक हिताचा देखील विचार करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे हे अंतिम ध्येय न मानता ते सामाजिक सेवेचे साधन मानले पाहिजे.असे तरुणांनी मनावर विंबविण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.
Users Today : 37