अकोट येथे उत्साहात कुणबी समाजाचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम संपन्न.

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी विशाल गवई अकोट                  अकोट येथे कुणबी समाजाचा हळदी कुंकू कार्यक्रम दिनांक २२ जानेवारी रोजी घेण्यात आला.हा केवळ हळदी कुंकुवाचा कार्यक्रम नसुन महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या विठुरायला नमन होते. महाराष्ट्राची संस्कृति किती संपन्न आहे.हे दाखविण्याचे हे निमित्तच होते,आजच्या या पिढीला वारकरी संप्रदायाची ओळख या माध्यमातुन व्हावी हाच उदात्त हेतू या कार्यक्रमाचा होता.यावेळी मार्गदर्शक श्री.सागर गवळी उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात सांगताना सांगितले की कुणबी समाज मंडळ असेच वर्षभर विविध कार्यक्रम राबविनार आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.अर्चना काळे यांनी केली.यावेळी या कार्यक्रमाला आयोजक समितीचे सदस्य सौ. अर्चना काळे,सौ. वृशाली वालसिंगे,सौ. प्रतीक्षा गवळी, सौ. आशा गवळी,सौ. मीना वालसिंगे,सौ. कोमल मानकर,सौ. संध्या काळे,रोशनी घावट,सौ. कल्पना घावट,सौ. दिपिका भगत,सौ.अक्षरा बोंडे,सौ.अश्विनी हरणे,सौ.मनिषा हरणे,गायत्री गोंडचर,सौ.सपना राऊत,सौ.वैशाली गोंडचर,सौ. शितल बोंडे,सौ.मंजू बोंद्रे,सौ.प्रिती हरणे,सौ.वंदना गोंडचर,सौ.सिमा गोंडचर,सौ.प्राची गोंडचर,सौ.मालती देशमुख हे उपस्थित होते.कार्याक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.दिपिका भगत यांनी केले.हळदी कुंकूचा कार्यक्रम हे माहेश्वरी भवन अकोट येथे अतिशय उत्साहात साजरा करण्यात आले.

 

0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *