वरवंड-बाळापूर मार्गावरील उदयनगर चौफुलीचे रुंदीकरणासह तात्काळ काँक्रीटीकरण करा..राम डहाके.

Khozmaster
2 Min Read

उदयनगर ,रफिक खान अर्धवट नाली बांधकाम व खोदकामामुळे उदयनगरसह,डासाळा, टाकरखेड,करवंड येथील गावकऱ्यांना सहन करावा लागतो नाहक त्रास..प्रतिनिधी, वरवंड बाळापुर मार्गावरील उदयनगर चौफुलीचे गेल्या वर्षभरापासून अर्धवट खोदकाम करून रखडलेले रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम विनाविलंब पूर्णत्वास न्यावे जेणेकरून जनता व गावकऱ्यांच्या हिताचे होईल अशी मागणी काँग्रेस नेते राम डहाके व तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांचेकडे दि.२३ जानेवारी रोजी निवेदनाद्वारे करत आंदोलनाचा इशारा दिला.चिखली खामगाव राष्ट्रीय महामार्ग तसेच बुलडाणा वरवंड बाळापूर मार्गाच्या चौफुली वरील उदयनगर ही महत्वाची बाजारपेठ आहे.परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा,दैनंदिन व्यापार व्यवहार यासाठी एकमेव बाजारपेठ असून महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग सुध्दा असल्याने मोठी वर्दळ असते.मात्र गेल्या वर्षभरापासून चौफुलीचे अर्धवट खोदकाम करून रुंदीकरण नाली बांधकाम, यासह काँक्रिटीकरणाचे काम बंद असल्याने वाहन धारक,व्यावसायिक तथा गावकऱ्यांनी मोठा त्रास सहन करावा लागतो. रखडलेले काम पूर्णत्वास नेण्यासंदर्भात दि.२५ मे रोजी निवेदन देऊन गावकरी व विविध पक्ष संघटनांच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली मात्र वर्ष लोटले तरीही काम सुरू झाले नाही.चौफुली लगत बुलडाणा रोडवरील कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात नाल्याला येणारे पाणी अनेकदा नागरी वस्तीतील घरात घुसून नुकसान होणे नित्याचेच झाल्याने उपरोक्त पुलाची उंची वाढविण्याची सुध्दा मागणी वेळोवेळी झाली.अशीच परिस्थिती डासाळा, टाकरखेड हेलगा, करवंड या गावांची सुध्दा आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनमानी कारभारामुळे जनतेला नाहक वेठीस धरल्या जात असून जनता त्रस्त आहे.जनसुविधा व जनहित लक्षात घेता अर्धवट रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे जेणेकरून गावकरी व जनहिताचे होईल अन्यथा लोकशाही मार्गाने लोकहितास्तव आंदोलनाचा इशारा काँग्रेस नेते राम डहाके व तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर, अक्रम खासाब यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांना निवेदनाद्वारे दिला.

0 9 4 7 1 3
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *