तिरंगा लहरा ..
अभिमाने फडकतो
तिरंगा प्रत्येक घरा
स्पर्धा करे अस्मानी
ध्वज अति उंच धरा
अमृतमहोत्सव सजे
सोहळासुखे साजरा
जाणून घ्या नियमा
करता सलाममुजरा
ध्वज संहिता जाणा
संविधान पहा जरा
अवमान चुका नको
उन्माद फुकामाजरा
जपा ध्वज अस्मिता
फोडू विखारी नजरा
ध्वज संचलन चाले
वेगळा असे नजारा
राष्ट्रगीत समजून गा
आवाज का लाजरा
जयकार भारताचा
गर्जेल भला बुजरा
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyakusum.com
Users Today : 1