मोदी सरकारने गॅस सिलेंडरचे भाव कमी करा :- रिपब्लिकन सेनेचे मागणी

Khozmaster
1 Min Read

अच्छे दिनाचे चूल पेटवू आंदोलन करू :- भाई विजयकांत गवई प्रति. चिखली:- मोदी सरकारने गॅस सिलेंडरचे भाव कमी करा असे निवेदन बुलढाणा, जिल्हाधिकारी यांना दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आले मोदी सरकारने गोरगरिबांवर मोठा अन्याय केला आहे गरिबांना उज्वला गॅस योजना ही मोफत लागू केली लाखो करोडो गोरगरिबांना ही योजनेचा लाभ घेतला पण कोरोना महामारीमुळे गोरगरिबांकडे पैसे राहिले नाही. आणि त्यातच मोदी सरकारने गॅस सिलेंडरचे भाव १०९० झाले आजच्या स्थितीत गोरगरिबा जवळ गॅस सिलेंडर घेण्यासाठी एवढी रक्कम मोजावी लागते गरिबांना मजूर केल्याशिवाय पर्याय नाही महागाई वाढल्याने गोरगरीब पुन्हा गॅस सोडून चूल पेटवत आहे मोदी सरकार हे अच्छे दिनाचे चॉकलेट देऊन एकदा उज्वला योजनेचा लाभ मोफत देतात आणि सर्व गॅस सिलेंडर च्या माध्यमातून वसूल करतात गोरगरिबांवर मोठा अन्याय मोदी सरकार करत आहे उज्वला योजना सबसिडी चे लाभार्थ्यांच्या खात्यात पडली नाही गॅस सिलेंडरचे भाव मोदी सरकारने येत्या 26 जानेवारी 2023 रोजी कमी करावे अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने अच्छे दिनाचे चूल पेटवून आंदोलन करू असा इशारा रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून दिला निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई, जिल्हा महासचिव सलीमभाई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *