प्रतिनिधी मुर्तीजापुर ठेकेदारांवर गुन्हा दाखल शहरातील जुनी वस्ती देवरण रोडवर नगरपरिषद देणे दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट नाल्याचे बांधकाम सुरू असताना 22 जानेवारी रोजी अचानक नाल्याची भिंत कोसळून मलतब्याखाली दबल्याने दोन मजूर ठार व एक गंभीर जखमी झाला या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला मृतक लकी पाचारे यांची आजी दुर्गाबाई कुमार पाचारे वय 60 राहणार रोहिदास नगर मोचीपुरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवरण रोडवर नगरपरिषद अंतर्गत सुरू असलेल्या नाली बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट जुनी वस्ती परदेशी पुरा येथील कॉन्ट्रॅक्टर गुलाबचंद दुबे यांना नेण्यात आले असता मिळवलेल्या कॉन्टॅक्टर चे काम सुरू असताना नाल्याची जुनी डब्बारची भिंत तशीच ठेवून काम सुरू असताना अचानक भिंत कोसळली यामध्ये काम करणारे मजूर सागर नरेश सोळंके वय 24 व लकी लखन पाचारे वय 20 हे दोघही भिंतीखाली दबल्याने त्यांचा मृत्यू झाला तर साबीर शहा मोहम्मद शहा वय 26 हा गंभीर रित्या जखमी झाल्याची घटनेवरून मृत्तकाच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून ठेकेदार गुलाबचंद दुबे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात कलम 304 व 338 नुसार गुन्हा दाखल करून ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल नागोराव भांगे करीत आहे
Users Today : 2