स्थानिक तेजस्वी स्पोर्टसची विद्यार्थीनी सिद्धी राजेश डिडोळकर हिने यवतमाळ येथे पार पडलेल्या 17 वर्षाखालील मुलींच्या गटात तिन हजार मीटर व 400 मीटर अडथळा (हर्डल्स) शर्यंतीत यश संपादन केले आहे.कोरोना संक्रमणानंतर तब्बल दोन वर्षांनी शालेय क्रिडा स्पर्धा यंदा पार पडल्यात या क्रिडा स्पर्धेत तेजस्वी स्पोर्टस बुलढाण्याची विद्यार्थीनी कु. सिद्धी राजेश डिडोळकर हिने यवतमाळ येथे दि. 23 व 24 जानेवारी रोजी पार पडलेल्या विभागीय मैदानी क्रिडा स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात तिन हजार मीटर धावणे व चारशे मीटर अडथळा (हर्डल्स) शर्यतीत विभागीय स्तरावर यश संपादन करून पुणे येथे दि. 29 ते 31 जानेवारी रोजी होणार्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कु. सिद्धी ही शारदा ज्ञानपीठ बुलढाण्याची विद्यार्थीनी असून ती आपल्या यशाचे श्रेय तिचे क्रिडा प्रशिक्षक विजय वानखेडे, राजेश डिडोळकर व तिची आई यांना देते. तिच्या या यशाबद्दल शारदा ज्ञानपीठचे डॉ. देशपांडे अॅड. कविमंडन, प्राचार्य जगताप मॅडम, अतंरकर मॅडम, क्रिडा शिक्षक राहूल औशलकर, अजय माहोरे यांनी तिचे अभिनंदन केले.
Users Today : 39